pune road accident sakal
पुणे

Pune Road Accident : ओव्हरटेक करताना पिकअपची दुचाकीला धडक

सिंहगडावरुन परत येत असलेले तीन तरुण गंभीर जखमी;

निलेश बोरुडे

किरकटवाडी : पीएमटी बसला ओव्हरटेक करून पुढे जात असताना पिकअपची समोरुन येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक बसली. सिंहगडावरुन परत येत असलेले तीन तरुण या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी एक तरुण वाघोली येथील तर दोन नगर जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली आहे.

सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी फाट्याजवळ तीन तरुण दुचाकीवरुन सिंहगडावरुन परत येत होते. अचानक पीएमटी बसला ओव्हरटेक करून पिकअप विरुद्ध बाजूला आल्याने दुचाकी व पिकअपची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात वैभव चत्तर, किरण माने व शिंगोणे( नाव माहित नाही) हे तीन तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

वर्दळीच्या ठिकाणी अपघात झाल्याने स्थानिक नागरिक तातडीने मदतीसाठी धावले. 108 क्रमांकावर फोन करुन रुग्णवाहिका मागविण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र लवकर प्रतिसाद मिळत नसल्याने व तरुणांच्या जखमांतून रक्तस्राव होत असल्याने स्थानिक नागरिक व काही तरुणांनी जखमींना संबंधित पिकअप मध्ये तातडीने रुग्णालयात पाठवून दिले. घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस हवालदार विलास बांबळे व प्रविण ताकवणे घटनास्थळी दाखल झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT