पुणे

Pune Road: सहा महिन्यांपासून काम रखडल्याने नागरिक त्रस्त, कामााला गती देण्याची मागणी

Roads In bad Condition: त्यानंतर हे काम ठप्प झाले आणि नागरिकांना आणखीनच मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.

सकाळ वृत्तसेवा

Kondhava Bad Rodes : शत्रुंजय मंदिर ते गंगाधाम चौक रस्त्यावरील पासलकर चौकात मागील सहा महिन्यांपासून महापालिकेच्या विविध विभागांकडून काम सुरू आहे. संथ गती असलेल्या कामामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

दोन महिन्यांपूर्वी सकाळच्या वृत्तानंतर हे काम १५ दिवसांत पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतर हे काम ठप्प झाले आणि नागरिकांना आणखीनच मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.

ड्रेनेज विभागाकडून केवळ १५ दिवसांची परवानगी घेऊन काम सुरू करत रस्ता बंद करण्यात आला होता. त्यानंतर पथ आणि पाणीपुरवठा विभागाचे काम करण्याचा निर्णय झाला आणि वेळ वाढला. त्यानंतरही मे अखेरिस काम पूर्ण होईल ही अपेक्षा होती. मात्र, जुलै उजाडला तरी रस्ता वाहतूकीस खुला झालेला नाही.

हा रस्ता बंद झाल्याने हगवणेनगर, हनुमान चौक, व्हीआयटी चौक, काकडेवस्तीतून वाहतूक वळविण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. आता पावसाळा सुरु झाल्यानंतरही काम पूर्ण न झाल्याने नागिरकांमध्ये नाराजी आहे.

१२ मीटर रुंद होणार रस्ता

सुरुवातीला हा रस्ता अत्यंत अरुंद होता. त्यामुळे सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती. मात्र, महापालिकने आता काही ठिकाणी जागा ताब्यात घेत रस्त्याच्या इतर कामासोबत रस्ता रुंदीकरण करण्याचेही काम केले आहे. आता हा रस्ता १२ मीटर रुंद होणार असल्याने वाहतूक कोंडी प्रश्न मोठ्या प्रमाणात मिटणार असल्याचा विश्वास स्थानिकांमध्ये आहे.

काम पूर्णपणे वेळेवर होईल याची काळजी घेतली जात होती. मात्र, पुणए जिल्हा खाण व क्रशरमालकांनी अचानक संप पुकारला. हा संप १५ दिवस लांबल्याने कच्च्या मालाचा पुरवठा झाला नाही. मात्र, आता संप मिटला असून पुरवठा सुरु झाला आहे. पुढी आठ दिवसात डांबरीकरणाचे काम पूर्ण करुन रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचा आमचा प्रयत्न आहे. -

सुशील मोहिते, शाखा अभियंता, पथविभाग, पुणे महापालिका

मागील सहा महिन्यापासून सदर रस्त्याचे केवळ काम सुरु असल्याचे दिसून येत आहे. रस्ता रहदारीचा असून पावसाळ्याच्या तोंडावर अधिक त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे महापालिकेने कोणत्याही परिस्थितीत सदर रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करुन वाहतुक सुरु करावी, ही आमची मागणी आहे.

- मितेश राठी, स्थानिक नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: ५ मिनिटांत भविष्य सांगायचा ‘खेळ’ उघड! भोंदू अशोक खरातची धक्कादायक मोडस ऑप्रेंडी समोर, स्वतंत्र दोन टीमचा वापर

IPL 2026 Marathi News : इम्पॅक्ट प्लेअरच्या विरोधात शुभमन गिल; म्हणतो, क्रिकेट हा ११ जणांचाच खेळ आहे.... ! BCCI वरील दबाव वाढतोय

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर परिते ग्रामस्थांचा सोमवारी न्याय मोर्चा

Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स सुमारे 900 अंकांनी खाली; 'या' मोठ्या कंपन्यांचे शेअर्स घसरले

Titwala Train Accident : भयंकर दुर्घटना! ट्रेनच्या इंजिनमध्ये मृतदेहाचे तुकडे; मृत व्यक्तीचे अवयव बाहेर काढण्यासाठी कापला कॅटल गार्ड, लोकल सेवा खोळंबली

SCROLL FOR NEXT