pune road sakal
पुणे

Pune News : आयडियल पार्कचा रस्ता होईना दुरुस्त; नागरिक त्रस्त

खोदकाम केल्यास निकृष्ट दर्जाच्या पद्धतीने रस्ता दुरुस्ती केली जाते

सकाळ वृत्तसेवा

कात्रज : कात्रज-कोंढवा रस्त्यावरी लेन क्रमांक १२ मधून आयडिअल पार्क सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या दोन वर्षापासून सातत्याने काहीना काही काम चालू असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे काम पुर्ण होत नसल्याने नागरिकांना वळसा घालून कात्रज-कोंढवा रस्त्यावर जावे लागत आहे.

सद्यस्थितीतही याठिकाणी ड्रेनेज विभागाकडून खोदकाम करण्यात आले असून रस्ता अडविण्यात आला आहे. मागील १५ दिवसांपूर्वी हे खोदकाम करण्यात आले असून अजूनही याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही.

सुरुवातीला पावसाळी पाण्याच्या लाईनसाठी आणि त्यानंतर ड्रेनेजसाठी रस्त्यांवर खोदकाम करण्यात आले. खोदकाम केल्यास निकृष्ट दर्जाच्या पद्धतीने रस्ता दुरुस्ती केली जाते. त्यानंतर काही काळातच रस्त्याची वाट लागल्याचे पाहायला मिळते.

गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकार सुरु आहे. हेमी पार्क, पवन पार्क, अक्षरा रेसिडेन्सी, यशोधन सोसायटी, फ्लॉवर रेसिडेन्सी, आयडियल पार्क आदी सोसायट्यांसाठी हा रस्ता असून साधारणतः दोन ते अडीच हजार नागरिक या सोसायट्यांमध्ये वास्तव्यास आहेत.

पावसाळ्यात कात्रज-कोंढवा रस्ता, शिवशंभोनगर, स्वामी समर्थ नगर भागातून उताराने मोठ्या प्रमाणात पाणी येऊन या रस्त्यांवरून सोसायट्यांत शिरते. त्यामुळे वारंवार महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करुनही रस्ता दुरुस्तीकडे अधिकाऱ्यांचे लक्ष गेलेले नाही. रस्त्यावर अनेक ठिकाणी चेंबर खचले असून मोठे खड्डे देखील पडले आहेत. त्यामुळे वाहन चालवणे तर अवघड झाले असून नागरिकांना नीट चालताही येत नाही.

महापालिकेच्या ड्रेनेज विभागाच्या संथ गतीच्या कामामुळे नागरिकांना मात्र नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तक्रार करूनही प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. मागील दोन वर्षांपासून या रस्त्यावर काही ना काही काम चालू असल्याचे सातत्याने दिसते. मात्र रस्ता एकदाचाच दुरुस्त का करण्यात येत नाही हा प्रश्न अनुत्तरित आहे.

- अमोल लोहार, स्थानिक नागरिक

दोन दिवस सलग अवकाळी पाऊस झाल्याने कामामध्ये अडथळा निर्माण झाला होता. ड्रेनेजलाईनमधून पाणीगळती होत असल्याने याठिकाणी दुरुस्तीसाठी खोदकाम करण्यात आले असून दोन दिवसात काम पूर्ण करून रस्ताही आमच्या खात्यांमार्फत दुरुस्त करुन देण्यात येईल.

- शशिकांत निवदेकर, कनिष्ठ अभियंता, ड्रेनेज विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT