पुणे

वर्तुळाकार रस्त्याची लगीनघाई!

मंगेश कोळपकर

पुणे - शहरातील उपनगरीय वाहतुकीचा चेहरा-मोहरा बदलणाऱ्या वर्तुळाकार उच्च क्षमता वाहतूक मार्गासाठी (एचसीएमटीआर) शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील मेट्रोचे सध्याचे आणि नियोजित विस्तारित मार्ग तसेच ‘पीएमपी’ची सेवा यांचा एकत्रित आराखडा तयार झाला आहे. त्यासाठी प्रलंबित २० टक्के खासगी जमिनीचे भूसंपादन महापालिकेने वेळेत केले तर ‘एचसीएमटीआर’चे काम जूनपर्यंत सुरू होण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी महापालिका प्रशासनाने युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ फेब्रुवारीला शहरात झालेल्या जाहीर कार्यक्रमात ‘एचसीएमटीआर’चे काम जूनपर्यंत सुरू करण्याचा आदेश महापालिकेला दिला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी रविवारीही संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात प्रकल्पाचा वित्तीय आराखडा तातडीने तयार करण्याचा निर्णय झाला आहे. शहराच्या 

१९८७ च्या विकास आराखड्यातही ‘एचसीएमटीआर’चा समावेश आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या रस्त्यासाठी वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मिळण्यासाठी त्याचा ट्रान्झिट ओरिएंटेड झोनमध्ये (टीओडी) समावेश केला आहे. परिणामी रस्त्याच्या दुतर्फा अडीच ते चार एफएसआय शक्‍य होणार असून, त्यामुळे घरांची उपलब्धताही वाढेल, असे महापालिकेने सांगितले.

असा जाणार वर्तुळाकार रस्ता
पुणे विद्यापीठ चौक, सेनापती बापट रस्ता, पौड फाटा, कर्वे रस्ता, दत्तवाडी, सारसबाग, स्वारगेट, नेहरू रस्ता, लुल्लानगर, वानवडी, रामवाडी, मुंढवा, वडगाव शेरी, विमाननगर चौक व विश्रांतवाडी

- प्रवासी वाहतुकीसाठी - बीआरटीची अखंडित बससेवा
- एलिव्हेटेड स्थानके - २६ 
- बीआरटी स्थानकांपासून पीएमपीची फिडर सेवा मिळणार 
- मेट्रोची पुणे विद्यापीठ, पौड रस्ता, स्वारगेट, नगर रस्त्यावर रामवाडी (भविष्यात वाघोली) स्थानकांचा एकात्मिक आराखड्यात समावेश 

शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी मेट्रो प्रकल्पाबरोबरच एचसीएमटीआर, बीआरटीचीही जबाबदारी महत्त्वाची आहे. त्यासाठी महामेट्रो आवश्‍यक ते सर्व सहकार्य करीत आहे. त्यासाठी चर्चाही सुरू आहे. 
- ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो

एचसीएमटीआरसाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. आर्थिक आराखडा तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. नियोजित वेळेत रस्त्याचे काम सुरू होऊ शकेल. 
- अनिरुद्ध पावसकर, पथ विभाग प्रमुख, महापालिका

भूसंपादन वेगात 
  अस्तित्वात असलेल्या रस्त्यांवरून १७ कि.मी. एचसीएमटीआर
  उर्वरित १९ कि.मी.साठीची ५० टक्के जागा महापालिकेच्या ताब्यात
   शासकीय विभागांच्या ताब्यात ३० टक्के जागा 
  खासगी २० टक्के जागा संपादित करायची आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अर्धशतकवीर पोरेलपाठोपाठ ऋषभ पंतही झाला बाद, दिल्लीचा निम्मा संघ परतला माघारी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT