Rickshaw Driver sakal
पुणे

Rickshaw : मीटर पुनःप्रमाणीकरण न केलेल्या ५० हजार रिक्षाचालक रडारवर

पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड, तसेच जिल्ह्यात एक लाख २० हजारांहून अधिक रिक्षा आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड, तसेच जिल्ह्यात एक लाख २० हजारांहून अधिक रिक्षा आहेत.

पुणे - प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुणे यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती या कार्यक्षेत्रातील तीन आसनी ऑटोरिक्षांकरिता खटुआ समितीच्या शिफारशीनुसार १ सप्टेंबर २०२२ पासून भाडेवाढ लागू केलेली आहे. रिक्षांचे मीटर पुनःप्रमाणीकरण करण्याकरिता मुदतवाढ देऊनही पुन:प्रमाणीकरण न करणाऱ्या ऑटोरिक्षा चालक, मालकांवर आता कारवाई करण्यात येणार आहे.

रिक्षाधारकांनी त्यांच्या रिक्षा भाडेमीटरचे पुनःप्रमाणीकरण व मीटर तपासणीचे काम मुदतीत न केल्याने, तसेच रिक्षा संघटनांकडून रिक्षा परवानाधारक, पालकांची गैरसोय टाळण्यासाठी मीटर पुनःप्रमाणीकरणाकरिता मुदतवाढ मिळण्याबाबत केलेल्या मागणीचा विचार करता मीटर पुनःप्रमाणीकरण करण्याच्या सुरुवातीस १ ते ३० नोव्हेंबर आणि नंतर १ डिसेंबर २०२२ ते ३१ जानेवारी २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, प्राधिकरणाने घेतला होता.

या मुदतीत मीटर कॅलिब्रेशन करून न घेणाऱ्या रिक्षाधारकांवर परवाना निलंबन किंवा तडजोड शुल्काची कारवाई करण्यात येणार आहे. मीटर कॅलिब्रेशन न केल्यास मुदत समाप्तीनंतर विलंबासाठी किमान सात दिवस व त्यापेक्षा अधिक प्रत्येक एक दिवसासाठी एक दिवस आणि एकूण कमाल निलंबन कालावधी ४० दिवस राहणार आहे. निलंबनाऐवजी तडजोड शुल्काचा विकल्प घेतल्यास मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसासाठी ५० रुपये, मात्र किमान ५०० रुपये व कमाल तडजोड शुल्क दोन हजार रुपयांपर्यंत असेल. मीटर तपासणीचे काम फुलेनगर व आळंदी रस्ता चाचणी मैदान येथे सुरू राहील, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी कळविले आहे.

५० हजार रिक्षाचालक रडारवर

पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड, तसेच जिल्ह्यात एक लाख २० हजारांहून अधिक रिक्षा आहेत. त्यातील सुमारे ६० टक्के रिक्षांचे मीटर कॅलिब्रेशनचे काम पूर्ण झाले असावे, असा प्रशासकीय अंदाज आहे. त्यामुळे सुमारे ५० हजार रिक्षाचालक आता कारवाईच्या रडारवर आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT