RTO-Pune
RTO-Pune 
पुणे

हॅंडलिंग चार्जेसचा गफला

मंगेश कोळपकर
पुणे - दुचाकी किंवा चारचाकी खरेदी करण्यासाठी जात असाल, तर काळजी घ्या. "आरटीओ हॅंडलिंग चार्जेस'च्या नावाखाली दुचाकीसाठी 500 ते 900 रुपये, तर चारचाकी वाहनांसाठी तीन ते पाच हजार रुपये जादा आकारले जात आहेत. हे पैसे प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) द्यावे लागतात, असे वितरकांचे म्हणणे आहे, तर, "आम्ही कोणतेही पैसे घेत नाहीत', असे "आरटीओ'कडून सांगण्यात येते. त्यामुळे ग्राहकांकडून वसूल केली जाणारी वरकमाई कोणाच्या खिशात जाते, हा आता संशोधनाचा विषय ठरला आहे.

वाहन खरेदी करण्यासाठी ग्राहक वितरकांकडे गेल्यावर त्यांना कोटेशन दिले जाते. त्यात वाहनकर, ऍक्‍सेसरीज, विमा आदींबरोबरच हॅंडलिंग चार्जेसचा समावेश असतो. ग्राहकाला दुचाकीची नोंदणी करून देणे ही वितरकांची जबाबदारी असते. मात्र त्यासाठीची कागदपत्रे आरटीओमध्ये सादर केल्यावर नोंदणी करून घेण्यासाठी ती रक्कम तेथे द्यावी लागते, असे वितरकांकडून सांगितले जाते. तसेच दुचाकीचा कर भरल्यावर मालकीचे नोंदणी प्रमाणपत्र घेण्यासाठीही 200 रुपये जादा आकारले जातात. ते पैसेही आरटीओकडे जमा करतो, असे ते सांगतात. "हॅंडलिंग चार्जेस'ची पावती मिळणार नाही, असेही ग्राहकांना सांगितले जाते.

पैसे कशासाठी?
वितरक आणि आरटीओ यांच्यात हॅंडलिंग चार्जेस हा अनेकदा वादाचा मुद्दा झाला आहे. आरटीओच्या अधिकाऱ्यांनी वितरकाकडे प्रत्यक्ष भेट देऊन कंपनीतून आलेले वाहन आणि विकले जाणारे वाहन तेच आहे, याची खातरजमा करण्यासाठी चासी क्रमांक पडताळून पाहायचा आहे. त्यानंतरच त्या वाहनाची नोंदणी होते. मात्र "हॅंडलिंग चार्जेस'च्या "सुविधे'मुळे वाहनाची पडताळणी कागदोपत्री होते अन्‌ त्या वाहनाची नोंदणी होते. लहान जिल्ह्यांत आरटीओ अधिकारी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करतात अन्‌ त्यानंतरच संबंधित वाहनाची नोंदणी होते, असे आरटीओतील सूत्रांनी सांगितले.

वितरक म्हणतात....
आरटीओ अधिकाऱ्यांना प्रती वाहन विशिष्ट रक्कम दिल्याशिवाय तातडीने वाहनाची नोंदणी होत नाही. अन्यथा, वाहने आरटीओमध्ये पाठवावी लागतात. त्यात दिरंगाई होते अन्‌ ग्राहकालाही विलंब होतो. प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आरटीओच्या अधिकाऱ्यांना अनेकदा वेळ नसतो. त्यामुळे ठराविक रक्कम ठरवून दिल्यावर प्रक्रिया वेगाने उरकते.

आरटीओच्या नावाखाली किंवा "हॅंडलिंग चार्जेस' म्हणून ग्राहकांनी कोणतेही पैसे वितरकांना देऊ नये. वाहन नोंदणीसाठी कायदेशीर प्रक्रिया केल्यावर कोणतीही जादा रक्कम द्यावी लागत नाही. या बाबत नागरिकांनी तक्रार केल्यास संबंधित वितरकावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
- संजय राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

वाहन विकत घेताना त्याची नोंदणी करून देणे ही वितरकाची जबाबदारी आहे. आरटीओचा कर भरल्यावरही हॅंडलिंग चार्जेसच्या नावाखाली वेगळे पैसे कशासाठी द्यायचे? वेगवेगळी कारणे सांगून ग्राहकांची लूट करण्याचा हा धंदा वितरक आणि आरटीओचे अधिकारी करीत आहेत.
- हृषीकेश कोंढाळकर, ग्राहक

ग्राहकाला दिले जाणारे कोटेशन
- ऍक्‍टिव्हा 5 जी - मूळ किंमत - 53 हजार 937 रुपये
- आरटीओ कर आणि स्मार्ट कार्ड - 6452 आणि 200 रुपये
- विमा ------------------------1892 रुपये
- ऍक्‍सेसरीज -----------------2450 रुपये
- हॅंडलिंग चार्जेस - ------------775 रुपये
- एएमसी, रोड साइड असिस्टन्स----424 आणि 308 रुपये
एकूण 66 हजार 435

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT