rto-office-pune Sakal
पुणे

Driving Licence : नियमांचे उल्लंघन करताय, मग वाहन परवाना सांभाळा!

आठ महिन्यांत ६९८ वाहनचालकांचे परवाने निलंबित, वाहतूक शाखेकडून कारवाई

अनिल सावळे

पुणे - वाहन चालविताना मोबाईलवर बोलत आहात... सिग्नलचे उल्लंघन, मद्य सेवन करून किंवा वेगाने वाहन चालवत असाल तर अपघाताची शक्यता आहेच. पण आता तुमचा वाहन परवानाही निलंबित होणार आहे. वाहतूक पोलिसांनी प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) मदतीने ६९८ वाहनचालकांचे परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित केले आहेत.

शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवरील दंडाची रक्कम काही कोटींवर पोचली आहे. वाहतूक पोलिसांनी यावर्षी जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत सहा लाख ९९ हजार ८७९ वाहनचालकांना सुमारे ४४ कोटींचा दंड आकारला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा आकडा कमी आहे.

परंतु या आकडेवारीवरून अनेक वाहनचालक नियमांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. दुचाकीवर मान वाकडी करून मोबाईलवर बोलणे, सिग्नलचे उल्लंघन, भरधाव वाहन चालविणे आणि विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांमुळे अपघात होत आहेत. अशा बेशिस्त वाहनचालकांचा परवाना निलंबित करण्याची शिफारस वाहतूक शाखेकडून आरटीओ विभागाकडे केली जाते. त्यानुसार आरटीओकडून ही कारवाई करण्यात आली.

वाहतूक नियमाचे उल्लंघन, वाहन परवाना रद्द केलेले चालक

(एक जानेवारी ते ८ सप्टेंबर २०२३) -

- ट्रिपल सीट ३४

- वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे - २२४

- सिग्नलचे उल्लंघन - २०५

- वेगाने वाहन चालविणे - ६७

- मद्य सेवन करून वाहन चालवणे - ६४

- धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे - १००

- अवैध प्रवासी वाहतूक - ४

बहुतांश अपघात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे होत आहेत. स्वत:चा आणि इतर निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येत आहे. त्यानंतरही पुन्हा नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधित वाहनचालकांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

- विजयकुमार मगर, पोलिस उपायुक्त, पुणे शहर वाहतूक शाखा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: १७ चेंडूंत ८८ धावांचं वादळ... वैभव सूर्यवंशीची विक्रमी खेळी अन् RR ची Point Table मध्ये उलथापालथ

Parth Pawar Clarification : प्रशांत किशोर राष्ट्रवादीसाठी काम करणार? पार्थ पवारांनी दिले स्पष्टीकरण; 'ही केवळ स्नेहभेट'

RR vs LSG Live: वैभव सूर्यवंशीने मोठा विक्रम मोडला; फिफ्टीनंतर 'A' सेलिब्रेशनची रंगलीय चर्चा... नेमका त्याचा अर्थ काय? Video Viral

Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; २१ वर्षांत तब्बल २५ बदल्या, आता नवी जबाबदारी

राज्यात फक्त एक महिना पुरेल इतकाच इंधनसाठा...छगन भुजबळ यांच्या विधानानं खळबळ, नेमकं कायम म्हणाले?

SCROLL FOR NEXT