Computer Education Google
पुणे

पुणे : संगणकसाक्षर तरीही वापराचा अभाव

ग्रामीण भागातील सरकारी शाळांमधील शिक्षकांची स्थिती; थिंक शार्पतर्फे सर्वेक्षण

मीनाक्षी गुरव : सकाळ वृत्तसेवा

पुणे : ग्रामीण भागातील सरकारी शाळांमधील ७० टक्के शिक्षक हे संगणकसाक्षर आहेत, परंतु शाळांमध्ये पुरेसे संगणक उपलब्ध नसणे, अथवा उपलब्ध संगणकाचा प्रशासकीय कामासाठी होणारा सर्वाधिक वापर, अशा कारणांमुळे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी मोबाईलवरील मर्यादित ‘स्क्रिन’चा वापर करावा लागत असल्याचे चित्र आहे. (pune rural area Lack of adequate computers in schools)

ग्रामीण भागातील सरकारी शाळांमधील संगणक साक्षरता निश्चित करण्यासाठी थिंक शार्प फाउंडेशनतर्फे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये पुणे जिल्ह्यासह बीड, जालना आदी जिल्ह्यातील जवळपास २७ शाळांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. यात ३१ टक्के शिक्षकांना डिजिटलचा वापर करून शिकविणे शक्य होते. कोरोना काळात मार्च २०२० पासून शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. परंतु ते अधिक प्रभावी बनविण्यासाठी आवश्यक असणारे पॉवर पॉइंट, एक्सेल, एमएस वर्ड, क्रिएटिव्ह ॲप्स्‌, आकर्षक व्हिडिओ बनविणे संगणकाअभावी अशक्य होत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.

प्रत्येक शिक्षकाकडे ॲण्ड्राइड फोन असला, तरीही मोबाइलच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना शिकविताना शिक्षकांना मर्यादांचा सामना करावा लागत आहे. शाळेमध्ये संगणक असला, तरीही त्याचा सर्वाधिक वापर हा प्रशासकीय कामासाठी होत आहे. त्यामुळे शाळेतील संगणक वापरावर मर्यादा येत आहेत.

- संतोष फड, संस्थापक, थिंक शार्प फाउंडेशन

शिक्षण प्रभावी करण्यासाठी शिक्षकांना संगणक किंवा लॅपटॉप असणे गरजेचे आहे. त्याद्वारे अभ्यासक्रमातील पाठ शिकविताना त्यांचा आराखडा, ग्राफिक्स करणे शक्य होते.

- रोहिदास मेमाणे, केंद्र प्रमुख, लोणी काळभोर

शिक्षकांच्या अडचणी...

  • शाळेतील संगणक प्रशासकीय कामासाठी अधिक वापरला जाणे

  • संगणक साक्षरता असली, तरी केवळ मूलभूत ज्ञान असणे

  • संगणक प्रणालीतील अद्ययावत ज्ञानाचा अभाव

  • मोबाईलद्वारे शिकविताना छोट्या ‘स्क्रीन’सह येणाऱ्या अन्य मर्यादा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT