pune
pune 
पुणे

पुणे ग्रामिण स्थानिक गुन्हे शाखेकडुन सराईत गुन्हेगार जेरबंद

पराग जगताप

पुणे - सराईत चोरट्याला पुणे ग्रामिणच्या स्थानिक गुन्हे शाखाने आळेफाटा परिसरात अटक करुन ओतूर पोलिसांच्या तांब्यात दिले असल्याची माहिती पुणे ग्रामिण स्थानिक गुन्हे शाखेच्या सूत्रांकडुन देण्यात आली.

भास्कर खेमा पथवे (४०, रा.नांदुरी दुमाला, ता.संगमनेर जि.अहमदनगर) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव असून त्याच्यावर ७ चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.

याबाबत ओतूर पोलिसात सुनिल गोरक्षनाथ वाघमारे रा.धोलवड याने त्यांचे ओतूर ब्राम्हणवाडा चौका येथील रसिका मोबाईल तसेच मितेश शरद डुंबरे यांचे मोरया मोबाईल शॉपी या दुकानातून मोबाईल फोन, पेन ड्राईव्ह, लॅप टॉप असा माल चोरीस गेले बाबत ता.३१ जानेवारी २०१९ रोजा तक्रार दिली होती. त्याप्रमाणे ओतूर पोलिसात गुन्हा दाखल होता.

या दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक पुणे ग्रामिणचे संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे सहायक पोलिस निरीक्षक रविंद्र मांजरे यानी इतर पोलीस कर्मचाऱ्याच्या मदतीने शोध घेत घेतला. त्यांना अहमदनगर जिल्हाचे रेकॉर्डवर असणारा आरोपी भास्कर खेमा पथवे हा आळेफाटा एस. टी. बसस्थानक परीसरात हॉटेल समाधान समोर उभा असुन गोणपाटात चोरीचे मोबाईल फोन व लॅपटॉप विक्रीसाठी घेऊन आला असल्याची बातमी मिळाल्याने त्यांनी त्यास ताब्यात घेतले. त्यांचे जवळ असलेल्या गोणपाटात एक एच.पी.कंपणीचा कॉम्पॅक मॉडेलचा लॅपटॉप तसेच जिवी कंपनीचे एकरा तसेच सॅमसंग कंपनीचे तीन व लाव्हा कंपनीचा एक असे एकुण १५ मोबाईल फोन एकुण ३४८३० रु.किंमतीचा माल मिळुन आला असुन सदर आरोपीला पुढील कारवाई साठी ओतूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
 
ही कारवाई यशस्वी करण्यासाठी पुणे ग्रामिणचे पोलिस अधिक्षक संदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पुणेचे पोलिस निरिक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलिस निरीक्षक स्थनिक गुन्हेशाखेचे रविंद्र मांजरे, सहायक पोलिस फौजदार दत्तात्रय जगताप, शंकर जम, सुनिल जावळे, शरद बाभळे, दिपक साबळे यांनी सहभाग घेतला.

सदर आरोपीकडुन आणखी गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता ओतूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश खुणे यांनी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT