Pune Sadashiv Peth Girl Murder Attempet Leshpal
Pune Sadashiv Peth Girl Murder Attempet Leshpal  esakal
पुणे

Pune Crime : 'तिची जात कुठली'? लेशपालच्या इंस्टा स्टोरीनं वेगळ्याच चर्चेला उधाण, सदाशिव पेठेतील 'ती' घटना!

सकाळ डिजिटल टीम

Pune Sadashiv Peth Girl Murder Attempet Leshpal Javalge : पुण्यातील सदाशिव पेठेतील त्या घटनेनं साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. लेशपाल जवळगे नावाच्या विद्यार्थ्यानं जर वेळीच त्या मुलीवरील हल्ला रोखला नसता तर चित्र वेगळे दिसले असते. यासगळ्यात लेशपालनं इंस्टावरुन एक स्टोरी शेयर केली असून त्यामुळे वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.

आपल्याकडे कोणत्याही गोष्टीचा संदर्भ जात याविषयाशी कसा जोडला जातो याचे उदाहरण सदाशिव पेठेमध्ये घडलेल्या त्या गोष्टीमुळे पुन्हा अधोरेखित झाले आहे. यापूर्वी देखील ऑलम्पिक सारख्या स्पर्धांमधून देशासाठी पदकं घेऊन येणाऱ्यांची जात विचारण्यापर्यत नेटकऱ्यांची मजल गेली होती. काल परवाच्या प्रकरणात एका माथेफिरु तरुणानं तरुणीवर कोयत्यानं हल्ला केला. त्यात लेशपालच्या प्रसंगावधानानं त्या मुलीचा जीव वाचला.

यासगळ्यात सोशल मीडियावर लेशपालवर कौतूकाचा वर्षाव होतो आहे. काही राजकीय पक्षांनी त्याला बक्षीसही दिले आहे. कित्येकांनी त्याच्या धाडसाची प्रशंसाही केली आहे. त्याचवेळी लेशपालनं सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. लेशपालनं आपल्या त्या पोस्टमध्ये अजूनही आपण कशाप्रकारे विचार करतो हे सांगितले आहे. लेशपालच्या त्या इंस्टा स्टोरीनं पुन्हा आपण किती खुज्या विचारांचे आहोत दे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

Pune Sadashiv Peth Girl Murder

लेशपाल त्या पोस्टमध्ये म्हणतो, त्या मुलीची आणि मुलाची जात कुठली असे मला डायरेक्ट मेसेज करुन मला विचारणाऱ्या सडक्या बुद्धिजीवांनो मग ते मेसेज डिलिट करा. ना तुम्ही तुमच्या जातीचे होऊ शकता, ना तुमच्या समाजाचे, कीड लागली आहे....अशा शब्दांत लेशपालला आलेल्या अनुभवांविषयी त्यानं थेटपणे सांगितले आहे. त्यामुळे एखाद्याचा जीव वाचवणे ही गोष्ट जातीशी कशी काय संबंधित असू शकते. असा प्रश्न यानिमित्तानं समोर आला आहे.

पुण्यातील सदाशिव पेठेत दिवसाढवळ्या जे काही घडलं त्याची चर्चा आता देशभरही झाली आहे. मात्र यासगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ज्याच्यामुळे सर्वात मोठा अनर्थ टळला त्या लेशपालनं अद्यापही समाजाची मानसिकता कशाप्रकारची आहे, लोकं एखाद्या गोष्टीकडे कशादृष्टीनं पाहतात हे सांगण्याचा त्यानं प्रयत्न केला आहे. यापूर्वी त्यानं त्याच्या प्रतिक्रियेतून भर रहदारी आणि वर्दळीच्या ठिकाणी अशा गोष्टी घडतात. हे गंभीर असल्याचे सांगितले होते.

लेशपालचं सगळीकडे कौतूक होतंय. त्याचे सगळ्यांनी अभिनंदनही केले आहे. मात्र यासगळ्यात त्याला काही जणांनी जे मेसेज केले आहे त्यामुळे तो दुखावला गेला आहे. सातत्यानं येणाऱ्या त्या मेसेजमुळे त्यानं ती गोष्ट सोशल मीडियावरुन सगळ्यांना सांगितली आहे. ती म्हणजे मला त्या मुला-मुलीची जात कोणती असे प्रश्न विचारण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT