Sakal Natya Mahotsav sakal
पुणे

Sakal Natya Mahotsav : नाट्य महोत्सवाची रसिकांसाठी पर्वणीच; काहीच तिकिटे शिल्लक

नाट्यरसिकांसाठी पर्वणी असणाऱ्या ‘सकाळ नाट्य महोत्सवा’ची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाट्यरसिकांसाठी पर्वणी असणाऱ्या ‘सकाळ नाट्य महोत्सवा’ची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

पुणे - नाट्यरसिकांसाठी पर्वणी असणाऱ्या ‘सकाळ नाट्य महोत्सवा’ची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. गुरुवारपासून (ता. १८) सुरू होणाऱ्या या महोत्सवाची तिकिटे खास वीस टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध असल्याने रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे महोत्सवाची आता काहीच तिकिटे शिल्लक असून दर्जेदार नाटकांचा आस्वाद घेऊ इच्छिणाऱ्या रसिकांनी लवकरात लवकर आपली तिकिटे आरक्षित करावी, असे आवाहन ‘सकाळ’ने केले आहे.

येत्या १८ ते २२ मे दरम्यान बालगंधर्व रंगमंदिर येथे दररोज रात्री ९.३० वाजता हा नाट्य महोत्सव रंगणार आहे. या नाट्य महोत्सवाचे मुख्य प्रायोजक ‘वरद प्रॉपर्टी सोल्यूशन्स प्रा. लि.’ हे आहेत. तर महोत्सवाचे ‘पॉवर्ड बाय’ प्रायोजक ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.’ हे आहेत. या महोत्सवात ‘सारखं काहीतरी होतंय’, ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’, ‘संगीत देवबाभळी’, ‘नियम व अटी लागू’ आणि ‘तू तू मी मी’ ही पाच नाटके सादर होणार आहेत.

विशेष म्हणजे, या महोत्सवात रंगभूमीवरील अतुलनीय योगदानासाठी ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना ‘सकाळ जीनगौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे. महोत्सवात सहभागी होणाऱ्या रसिकांना या गौरव क्षणाचे साक्षीदार होण्याची संधीही मिळणार आहे.

तिकिटांचे दर (प्रति व्यक्ती)

  • संपूर्ण महोत्सवाचे तिकिट (तळमजला) - रुपये १८००

  • संपूर्ण महोत्सवाचे तिकिट (बाल्कनी) - रुपये १२००

  • प्रतिनाटक तिकिट (तळमजला) -रुपये ४००

  • प्रतिनाटक तिकिट (बाल्कनी) - रुपये ३००

तिकिटे मिळण्याची ठिकाणे व वेळ

  • बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता - सकाळी ९ ते ११.३० व सायंकाळी ५ ते ८

  • यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड - सकाळी ९ ते ११.३० व सायंकाळी ५ ते ८

  • वरद प्रॉपर्टी सोल्युशन्स प्रा. लि., मुख्य कार्यालय, नवले आय टी झोन, फेज ३, नवले पुलाजवळ - सकाळी ११ ते सायंकाळी ५

  • ‘लोकमान्य मल्टीपर्पज को. ऑप. सोसायटी लि.’चे सेनापती बापट रस्ता व नारायण पेठ शाखा ः सकाळी ११ ते सायंकाळी ५

  • फोन बुकिंग - ९५९५८३०५५५

  • संकेतस्थळ - ‘बुक माय शो’

महोत्सवाची वैशिष्ट्ये

  • विविध विषयांवरील पाच दर्जेदार नाटकांचा समावेश

  • मराठी रंगभूमीवरील आघाडीच्या कलाकारांचा सहभाग

  • रंगभूमीवर अतुलनीय योगदान दिलेल्या कलाकाराचा सन्मान

  • कधीही नाटक न पाहिलेल्या रसिकांना सामावून घेण्याचा विशेष प्रयत्न

  • संपूर्ण महोत्सवाचे तिकिट घेतल्यास विशेष सवलत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway : कोकणवासीयांचा जीव टांगणीला! मंत्री गडकरींनी दिलेली डेडलाईन संपणार; मुंबई-गोवा हायवे पूर्ण होण्यासाठी अजून किती महिने वाट पाहावी लागणार?

ना शुभमन गिल, ना सूर्यकुमार... Asian Games साठीच्या संभाव्य भारतीय संघाच्या यादीतून नावं गायब; जाणून घ्या कारण

आता काकूंची जिरणार! स्वानंदीसमोर येणार चिंगी गरोदर असल्याचं सत्य; ऐन लग्नात राजवाडेंच्या सुनेचा रुद्रावतार

Abhishek Banerjee Attacked : पश्चिम बंगालमध्ये खळबळ! TMC खासदार अभिषेक बॅनर्जींवर थेट जमावाकडून हल्ला; 'चोर चोर'च्या घोषणा देत बेदम मारहाण, अंडी-दगडंही फेकली

Mumbai Crime: पुण्यातील विषारी दारुचे धागेदोरे भिवंडीत, तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT