दैनिक ‘सकाळ’ sakal
पुणे

Pune : पुण्यात दैनिक ‘सकाळ’च अव्वल !

‘एबीसी’ची आकडेवारी; ५.४९ लाख खपासह ‘सकाळ’ नंबर वन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्यात दैनिक ‘सकाळ’ निर्विवाद पहिल्या क्रमांकावर असल्याचे देशातील वर्तमानपत्रांच्या खपाचे परीक्षण करणाऱ्या ऑडिट ‘ब्यूरो ऑफ सर्क्युलेशन’ (एबीसी) या संस्थेच्या आकडेवारीनुसार सिद्ध झाले आहे. देशातील वृत्तपत्रांच्या खपाची ‘एबीसी’ची आकडेवारी माध्यम जगतात विश्वासार्ह मानली जाते.

पुणे आवृत्तीचा दैनिक ‘सकाळ’चा दररोजचा खप पाच लाख ४९ हजार ३३९ असल्याचे ‘एबीसी’ची ताजी आकडेवारी सांगते आहे. ही आकडेवारी ‘एबीसी’ने जुलै ते डिसेंबर २०२२ या काळात केलेल्या परीक्षणाची आहे. दैनिक ‘सकाळ’चा महाराष्ट्रातील एकूण खप १० लाख ६४ हजार ७२१ असल्याचे ‘एबीसी’ने म्हटले आहे. ‘एबीसी’ ही संस्था १९४८ मध्ये स्थापन झालेली आहे. ना-नफा तत्वावर चालणाऱ्या या संस्थेत प्रकाशक, जाहिरातदार आणि जाहिरात संस्था सदस्य आहेत. ‘एबीसी’च्या सदस्य प्रकाशकांच्या खपाची आकडेवारी तपासण्याचे काम संस्थेमार्फत केले जाते.

वाचकांशी अतूट नाते

पुण्यात वाचकांच्या पाठबळावर ‘सकाळ’ने ‘एबीसी’मध्ये आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. वाचकांच्या रोजच्या जगण्याला आधार आणि आकार देणाऱ्या विश्वासार्ह बातम्या, लेख ही ‘सकाळ’ची परंपरा आहे.

काळानुसार बदलणाऱ्या विविध क्षेत्रांतील आव्हानांना सामोरे जाताना ‘सकाळ’ वाचकांच्या कुटुंबातील सदस्य बनून सोबत उभा राहतो. कुटुंबासाठी आणि कुटुंबातील प्रत्येकासाठी रोज नवा आशय घेऊन येणाऱ्या ‘सकाळ’चे वाचकांसोबतचे अतूट नाते पिढ्यान् पिढ्यांचे आहे. विस्तारणारे पुणे महानगर विकासाच्या नव्या वाटा शोधत आहे.

या शोधात दैनिक ‘सकाळ’ने सातत्याने तज्ज्ञांच्या सहकार्याने उत्तम आणि उपयुक्त ते निवडून वाचकांसमोर मांडले आहे. प्रसंगी परखड भूमिका घेऊन समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘सकाळ’ने पुढाकार घेतला आहे. या साऱ्याचे प्रतिबिंब म्हणून दैनिक ‘सकाळ’ पुणेकर वाचकांच्या सातत्यपूर्ण पसंतीस उतरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Update : मॉन्सूनची कोकणात दमदार एन्ट्री! राज्यातील 'या' २६ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी

Ancient Heritage Discovery : भुदरगड तालुक्यात सापडला मध्ययुगीन काळातील दुर्मीळ ठेवा; ज्योतिर्लिंग मंदिराबाहेर आढळल्या गूढ शिळा, शेकडो वर्षांपूर्वीचा इतिहास उजेडात

Abhijit Deepke: शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याशिवाय थांबणार नाही: अभिजित दीपके, कोणावर तरी जबाबदारी निश्चित करावीच लागणार

Monsoon Alert: मॉन्सूनचा वेग मंदावणार; १५ जूनपर्यंत पेरणीची घाई टाळा, शेतकऱ्यांना सरकारचा इशारा

Purandar Airport: पुरंदर विमानतळासाठी ६० टक्के भूसंपादन; संमतिपत्रे सादर करण्यासाठी दोन दिवसांची मुदत, आतापर्यंत ९०० कोटी रुपयांच्या मोबदल्याचे वाटप

SCROLL FOR NEXT