मंत्री रवींद्र चव्हाण
मंत्री रवींद्र चव्हाण sakal
पुणे

Pune : राज्यात येत्या सोमवारपासून सक्षम पंधरवडा साजरा करणार; पेट्रोलियम मंत्रालयाच्यावतीने पुढाकार

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या पुढाकाराने पुणे शहरात येत्या सोमवारपासून (ता.२४) ऊर्जेची बचत, शाश्वत विकास आणि पर्यावरण संवर्धनासाठी सक्षम पंधरवड्याचे (संरक्षण क्षमता महोत्सव) आयोजन करण्यात आले आहे.

हा पंधरवडा २४ एप्रिल ते ८ मे २०२३ या कालावधीत 'नेट झिरो' या संकल्पनेवर आधारित साजरा केला जाणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या पंधरवड्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एचपीसीएल) पुणे विभागाचे विपणन अधिकारी गौरव अग्रवाल यांनी शुक्रवारी (ता.२१) पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली.

यावेळी हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या पुणे विभागाचे विपणन अधिकारी यशपाल चौकी, मनुष्यबळ अधिकारी घनश्याम गायकवाड, पेट्रोल व डिझेल डीलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते अली दारूवाला आदी उपस्थित होते.

या पंधरवड्यात तेल कंपन्यांनी आयोजित केलेल्या रांगोळी आणि तेल संवर्धनावर विद्यार्थ्यांनी केलेली लघुनाटिका पाहता येणार आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी समूह संभाषण, वादविवाद, महाविद्यालयांमध्ये भित्तिचित्रे स्पर्धा, इंधन कार्यक्षम ड्रायव्हिंग स्पर्धा, लेख लेखन आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.

रेडिओवरून जनजागृतीसाठी जिंगल्स प्रसारित केल्या जातील. धन आणि तेल संवर्धनासाठी शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांचा त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल सत्कार करण्यात येणार असल्याचे यशपाल चौकी यांनी सांगितले.

गौरव अग्रवाल म्हणाले, "जीवाश्म इंधनावरील खर्चाला आळा घालणे, परकीय तिजोरीवरील वाढते ओझे कमी करणे आणि जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे निर्माण झालेल्या हरितगृह वायूच्या प्रतिकूल परिणामांपासून पर्यावरणाचे रक्षण करणे हे या कार्यक्रमाचे अंतिम लक्ष्य असल्याचे अग्रवाल यांनी यावेळी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल; थोड्याच वेळात होणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT