पुणे

सलून दुकाने सुरु करण्याची परवानगी द्या; अन्यथा...

दत्ता म्हसकर

जुन्नर : सरकार आमच्या मागण्यांना दाद देत नसल्याने आता एक जुलै रोजी सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा जुन्नर तालुक्यातील नाभिक समाजाने दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी प्रशासनास व प्रसिद्धीस दिले आहे.

जुन्नर तालुक्यातील व्यावसायिकांची शुक्रवारी बैठक झाली. यावेळी तालुकाध्यक्ष अरूण क्षीरसागर, उपाध्यक्ष सचिन कालेकर, नित्यानंद नेवकर, सुनिल खंडागळे, जुन्नर शहराध्यक्ष सचिन डाके, तेजपाल रायकर व व्यावसायिक उपस्थित होते.

तालुक्यात सुमारे एक हजार २०० सलून व्यावसायिक असून गेली ९० दिवस व्यवसाय बंद असल्याने अनेक जणांवर आर्थिक संकट ओढवले आहे. आजपर्यंत अनेक अर्ज विनंत्या केल्या. परंतु कोणी दखल घेत नसल्याने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले.
भंडारा शहरात अंगावर राॅकेल ओतून सलून व्यावसायिकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. गेल्या आठ दिवसांत कवंटेमहाकाळ, चंद्रपूर व भंडारा आत्महत्येचे प्रयत्न झाले आहेत. सरकार सलून व्यावसायिकांचा अजून किती अंत पाहणार व अजून किती बळी घेणार असा सवाल समाज विचारत आहे. सरकार ऐकून बहिरे आणि पाहून आंधळे असल्याचे सोंग का घेते आहे हा प्रश्न समाजाला पडला आहे.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

गेली तीन महिने सलून व्यावसायाला परवानगी नसल्याने घर खर्च भागवणे मुश्किल झाले आहे. त्यामध्ये तीन महिन्यांचे दुकान भाडे व लाईट बिलाचा बोजा वाढला आहे. यामुळे अनेकांचे मानसिक व अर्थिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळे सलून व्यावसायिकांनी आता टोकाची भूमिका घेतली असल्याचे सचिन कालेकर यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

राज्य सरकारने सलून दुकानदारास त्वरीत भरीव अर्थिक मदत देऊन सहा महिन्यांचे दुकानभाडे व लाईट बिल माफ करावे व सलून व्यावसायास सशर्त परवानगी द्यावी अशी मागणी निवेदनात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT