Sanjay Raut esakal
पुणे

Sanjay Raut : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवणुकीबाबत पटोलेंची भूमिका मान्य

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवाव्यात ही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भूमिका मान्य आहे.

प्रशांत पाटील

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवाव्यात ही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भूमिका मान्य आहे.

पुणे - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवाव्यात ही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भूमिका मान्य आहे. पण प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी असल्याने तेथे आघाडी करावी की नाही याचा निर्णय आम्ही पक्षाचे नेते एकत्र बसून घेऊ, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

पुणे दौऱ्यावर असताना संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी बोलत होते. राऊत म्हणाले, ‘‘कसबा विधानसभा मतदारसंघाची राज्यात काय होणार याचे चित्र दाखवणारी आहे. चिंचवडला राहुल कलाटे यांना उमेदवारी दिली नाही ही चूक झाली, त्यांना उमेदवारी द्यायला हवी होती. पुढच्या विधानसभा आणि लोकसभा आम्ही एकत्र लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

विधानसभेच्या २०० जागा आणि लोकसभेत ४० जागा जिंकू शकतो. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी न करण्याचा निर्णय भूमिका मान्य आहे. स्थानिक निवडणुकांमध्ये तेथील समीकरणे, परिस्थिती वेगळी असते, त्यामुळे त्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा लागेल. पण जेथे आवश्‍यकता असले तेथे तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसून चर्चा करतील.

हक्कभंग नोटीसवर राऊत म्हणाले, ‘मी विधिमंडळाचा आदर करतो, सध्या दौऱ्यावर असल्याने मला अजून नोटीस मिळालेली नाही, ती पाहिली देखील नाही. पण विधीमंडळात ४० आमदार जी भाषा वापरतात त्यावर कारवाई व्हायला हवी. अजून राज्यात काही प्रमाणात कायद्याचे राज्य आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे अशी भूमिका राऊत यांनी घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

MPSC Success Story: वीटभट्टी कामगाराच्या मुलाची जिद्दीने यशाला गवसणी; एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक, आई-वडीलांनी उपाशी राहून दिलं शिक्षण!

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पाठ्यपुस्तकांबरोबर आता दफ्तरही मिळणार मोफत; ४२ लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा

Latest Marathi News Update: बिल गेट्स यांचे आंध्र प्रदेशातील गन्नवरम विमानतळावर आगमन

Kolhapur Crime : आठ दिवस भीतीत, सोने विकल्यानंतर बिनधास्त; अखेर पंचवीस दिवसांनी संशयित पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT