पुणे

किकवीत ट्रकला धडकून मोटारीतील तरुणाचा मृत्यू

CD

नसरापूर, ता. १८ : पुणे-सातारा महामार्गावर किकवी (ता. भोर) येथे निष्काळजीपणे उभ्या केलेल्या ट्रकला मोटारीची धडक बसून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पिनाक शैलेंद्र सूर्यवंशी (वय २६, रा. आरेवाडी, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली), असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील शैलेंद्र सूर्यवंशी (वय ६१, रा. येरवडा, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुरुवारी (ता. १७) पिनाक मोटारीने (क्र. एमएच १२ क्यूएफ ९७४१) आरेवाडी येथून पुण्याला येत असताना रात्री ९ च्या सुमारास किकवी येथील उड्डाणपुलावर हा अपघात झाला. रस्त्याच्या डाव्या बाजूला तिसऱ्या लेनवर पांढऱ्या रंगाचा ट्रक (क्र. जीजे ०३ सीडब्ल्यू ८७८६) निष्काळजीपणे उभा होता. या ट्रकला पिनाकच्या मोटारची जोरदार धडक बसली, त्यात तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर ट्रक चालक वाहन सोडून पळून गेला. राजगड पोलिसांनी पिनाक याला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. फरार ट्रक चालकाचा शोध सुरू असून, पोलिस हवालदार सागर गायकवाड पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandigram Bypoll : पश्चिम बंगालमधील नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठा ट्विस्ट; ममता बॅनर्जींच्या उमेदवाराची अचानक माघार, नेमकं काय घडलं?

LP Gas Tanker Accident: वाडाखडकोना येथे एलपी गॅस टँकर कलंडला; गळती न झाल्याने मोठा अनर्थ टळला

Festival Makeup Skin Care: सणासुदीला मेकअपमुळे त्वचा बिघडतेय? १० मिनिटांत करा ‘हा’ घरगुती राइस जेल; चेहरा दिसेल फ्रेश

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Pali Stray Dogs: पालीत भटक्या कुत्र्यांचा कहर; १० वर्षांच्या चिमुरडीसह भाविक महिलेला चावा

SCROLL FOR NEXT