Pune Satara Highway Traffic Sakal
पुणे

Christmas Holiday : पुणे-सातारा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी

नाताळ सणाच्या सुट्टयांचा आंनद घेण्यासाठी शनिवारी नागरीक मोठ्या संख्येने बाहेर पडले.

महेंद्र शिंदे

नाताळ सणाच्या सुट्टयांचा आंनद घेण्यासाठी शनिवारी नागरीक मोठ्या संख्येने बाहेर पडले.

खेड-शिवापूर - नाताळ सणाच्या सुट्टयांचा आंनद घेण्यासाठी शनिवारी नागरीक मोठ्या संख्येने बाहेर पडले. त्यामुळे शनिवारी सकाळपासून पुणे-सातारा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होती.

रविवारची सुट्टी त्यात रविवारी नाताळ सण आहे. अनेक जणांना नाताळ सणाच्या सुट्ट्या आहेत. या सुट्टयांचा आंनद घेण्यासाठी नागरीक शनिवारी मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. अनेक जण या सुट्टयांसाठी कोकण, गोवा आदी ठिकाणी चालले आहेत. त्यामुळे या भागात जाणाऱ्या नागरीकांमुळे शनिवारी पुणे-सातारा रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. सकाळी आठ वाजल्यापासून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची पुणे-सातारा रस्त्यावर गर्दी दिसून आली.

या वाहनांमुळे पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या. साताऱ्याकडे जाणाऱ्या टोल नाक्यावर शनिवारी सुमारे एक किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शनिवारी दुपारपर्यंत साताऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांची गर्दी कायम होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought Survey: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ऐंशी टक्के क्षेत्राचे दुष्काळी पंचनामे; तीस हजार ६०८ गावांतील प्रक्रिया पूर्ण

Religious Tourism: प्रयागराजमधील चार प्राचीन शिवमंदिरांचा कायापालट; धार्मिक पर्यटनासाठी पाच कोटींचा निधी मंजूर

Healthcare News : रिम्स रुग्णालयात चार महिन्यांत कार्डिॲक केअर युनिट सुरू होणार; पहिल्या टप्प्यात ८ खाटांची व्यवस्था

Latest Marathi News Live Update : अभिजीत दीपके दिल्लीला रवाना होणार

Mumbai News: जे. जे. वसतिगृहात २१ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, अस्वच्छतेमुळे साथीच्या आजारांची ९० जणांना लागण

SCROLL FOR NEXT