Road-Work-issue
Road-Work-issue 
पुणे

रखडलेल्या कामासाठी एकत्र येण्याचा निर्धार

महेंद्र शिंदे

खेड-शिवापूर - पुणे-सातारा रस्त्याच्या रखडलेल्या रुंदीकरणाचे ‘सकाळ’ने मांडलेल्या वास्तवामुळे हे काम लवकर मार्गी लागेल, असा आशावाद स्थानिक नागरिक, प्रवासी आणि लोक प्रतिनिधी यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर पुणे-सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाची दुरवस्था मांडल्याबद्दल ‘सकाळ’चे सर्व स्तरांतील नागरिकांनी आभार मानले आहेत.

गेल्या नऊ वर्षांपासून पुणे-सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम रखडले आहे. या रखडलेल्या कामामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असून, त्यात निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. ७) ‘सकाळ’ने ‘महामार्ग नव्हे, अडथळ्यांची शर्यत’ या मथळ्याखाली पुणे-सातारा रस्त्याची दुरवस्था मांडली होती. तसेच पुणे-सातारा रस्त्याच्या रखडलेल्या रुंदीकरणासाठी एकत्र येण्याचा निर्धार केला. सातारा रस्त्याचे हे वास्तव मांडण्याची आवश्‍यकता होती.

पुणे-सातारा रस्त्याची वस्तुस्थिती मांडल्याबद्दल ‘सकाळ’चे आभार. रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे नागरिकांचे बळी जात असल्याने प्रशासनाने लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण करावे. ही आमची भूमिका आहे. रस्त्याच्या कामातील अडचणी दूर करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हे काम मार्गी लावावे. अन्यथा शिवसेनेकडून पुढचे आंदोलन अतिशय तीव्र स्वरूपाचे करण्यात येईल.
- कुलदीप कोंडे, शिवसेना सह संपर्कप्रमुख

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रिलायन्स इन्फ्रावर अंकुश ठेवून हे काम तातडीने पूर्ण केले पाहिजे. ‘सकाळ’ने पुणे-सातारा रस्त्याच्या या मांडलेल्या भीषण वास्तवामुळे आता तरी सरकारला जाग येईल. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्‍यक आहे.
- अभयसिंह कोंडे, उपाध्यक्ष, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस

‘सकाळ’ने पुणे-सातारा रस्त्याची खरी परिस्थिती समोर आणल्याबद्दल आभार. आजपर्यंत या रस्त्यावर झालेल्या अपघातात सर्वांत जास्त बळी स्थानिक नागरिकांचे गेले आहेत. त्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण होणे आवश्‍यक आहे. अन्यथा आम्ही स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरू.
- संदीप मुजुमले, सरपंच, कोंढणपूर

रस्त्याच्या चुकीच्या कामामुळे आजपर्यंत या रस्त्यावर अनेकांचे बळी गेले आहेत. त्यात माझ्या भावाचाही समावेश आहे. पुढील काळात अपघातात बळी जाऊ नये यासाठी रस्त्याचे काम लवकर पूर्ण झाले पाहिजे. ‘सकाळ’ने दिलेल्या या वृत्तामुळे या कामाला वेग येईल, अशी अपेक्षा आहे. 
- डॉ. संजय क्षीरसागर 

शिंदेवाडी ते सारोळा या दरम्यानच्या रस्त्यावर वाहन चालविणे म्हणजे त्रासदायक आहे. ‘सकाळ’ने ही परिस्थिती मांडल्याने रस्त्याचे काम लवकर मार्गी लागून आमचा प्रवास सुखद होईल, अशी अपेक्षा आहे.
- योगेश मोने, प्रवासी

आतातरी प्रशासनाला जाग येईल, अशी आशा आहे. तसेच या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत आवाज उठविण्यासाठी स्थानिक नागरिकांनीही जागे होणे गरजेचे आहे.
- राम शिंदे, नागरिक

‘सकाळ’ने पुणे-सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाचे भीषण वास्तव मांडले आहे. त्याचा परिणाम होऊन परिस्थिती सुधारेल.
- प्रकाश निगडे, नागरिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT