crime esakal
पुणे

भंगार व्यावसायिक व भिक्षेक-यांमुळे खुनाच्या गुन्ह्याची झाली उकल

नदीपात्रात झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना पोलिसांनी भंगार व्यावसायिक व भिक्षेक-यांसह विविध खब-यांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शिवाजीनगरमधील खुडे पुलाखाली नदीपात्रात झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना पोलिसांनी भंगार व्यावसायिक व भिक्षेक-यांसह विविध खब-यांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केली आहे. तसेच आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी २५५ सीसीटीव्हींचे फुटेज तपासले.

महेश शिवाजी देव ऊर्फ तंबी (वय ३०, रा.खुडे ब्रिजजवळ शिवाजीनगर) आणि आकाश प्रकाश यादव (वय ३३ वर्ष रा. शनिवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मामा असे खून झालेल्याचे नाव असून पोलिस संबंधित व्यक्तीची माहिती जमा करीत आहेत. शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खुडे पुलाखाली अज्ञात मृतदेह आढळला होता. मृतदेहाचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतर संबंधिताचा खून झाल्याचे स्पष्ट झाले होते.

त्यानुसार तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेजसह परिसरातील कचरावेचक आणि भंगारवाल्याने दिलेल्या माहिती एकत्रित केली. तांत्रिक विश्लेषणाव्दारे खुनाच्या ठिकाणापासून जवळच्या रस्त्यावर कचरा वेचणारे, भंगार व्यावसायिक दुकानदार, भिख मागणा-यांसह ७० ते ७५ लोकांकडे पोलिसांनी चौकशी केली. त्याशिवाय वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिता मोरे आणि पोलिस निरीक्षक विक्रम गौड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरिक्षक अतुल क्षिरसागर यांनी हद्दीत फिरून तपास केला. त्यानुसार पोलिसांनी दोघांनी ताब्यात घेतले.

दारू पिण्याच्या वादातून झाला खून

आरोपींकडे केलेल्या चौकशीत त्यांनी दारूच्या पिण्याच्या वादातून खून केल्याची कबुली दिली आहे. पोलिस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिता मोरे, पोलिस निरिक्षक विक्रम गौड, अर्जुन नाईकवाडे, अविनाश भिवरे, रणजित फडतरे, बशिर सय्यद, रूपेश वाघमारे, कांतिलाल गुंड, संतोष मेमाणे, शरद राऊत, अनिकेत भिंगारे, राहुल होळकर यांनी या खुनाचा तपास केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, तरीही संघात एक बदल! भारताच्या Playing XI मध्ये कोणाची एन्ट्री?

AI Powered Cancer Diagnosis: तंबाखू, प्रदूषण की केमिकल? DNA पाहून कॅन्सरचं ‘खरं कारण’ शोधणार आता AI!

Hadapsar News : थायलंडमधील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीस अभिजीत आर्ट्सचे डायमंड वर्क

Pune Rain Update : पुढील दोन दिवस शहरात पावसाची उघडीप

पाकिस्तानने मदत नाकारली! सौदीने थेट इस्रायलकडे मागितला गुप्तचर यंत्रणेचा सपोर्ट; हुती बंडखोरांचा उद्रेक

SCROLL FOR NEXT