पुणे

शाळा इमारती, जलजीवनच्या रखडलेल्या कामांना निधी द्या

CD

पुणे, ता. १८ : ‘‘जिल्ह्यातील धोकादायक शाळांच्या इमारतींची केवळ डागडुजी न करता आवश्यकतेनुसार त्यांचे निर्लेखन करून नवीन वर्गखोल्या उभाराव्यात. निधीअभावी रखडलेल्या जलजीवन मिशनच्या कामांनाही प्राधान्य देऊन ती तातडीने पूर्ण करावीत,’’ अशा सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रशासनाला दिल्या.
जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांचा आढावा घेण्यासाठी सुळे यांनी सोमवारी जिल्हा परिषदेत बैठक घेतली. जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, सभापती अंकिता पाटील ठाकरे व जितेंद्र बडेकर यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.
या बैठकीत शाळा, आरोग्य, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, रस्ते आणि ग्रामविकासाशी संबंधित प्रश्नांवर चर्चा झाली. जिल्हा परिषद शाळांमध्ये संरक्षक भिंती, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, रंगरंगोटी यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. सर्व शाळांना ई- लर्निंग फलक उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली. अंगणवाडी इमारतींची दुरवस्था आणि नादुरुस्त पाणी गाळण यंत्रांचा प्रश्नही बैठकीत मांडण्यात आला. जिल्हा परिषदेतील शिक्षक, बालविकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी आदी रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी करण्यात आली.

कचरा वर्गीकरणासाठी जागेची अडचण
कचरा संकलनासाठी वाहने उपलब्ध असली, तरी कचऱ्याचे वर्गीकरण आणि प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक जागा नसल्याने अडचणी येत असल्याचेही बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले. या प्रश्नांवर संबंधित विभागांनी आवश्यक कार्यवाही करून प्रलंबित कामांना गती द्यावी, अशी सूचना सुळे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात आजपासून ३१ ऑगस्टपर्यंत जमावबंदी लागू, राहुल गांधींच्या कार्यक्रमाचे काय? परवानगी मिळणार का?

NATIONAL SPORTS AWARDS 2025: यंदा 'खेलरत्न' कुणालाच नाही, १७ अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूंमध्ये एकही क्रिकटपटू नाही

'डर' च्या सेटवर शाहरुख खानवर संतापलेला सनी देओल; रागाच्या भरात असं काहीतरी केलं की सगळेच बघत राहिले, शेवटी...

Marathi News Updates : शिवसेना कुणाची? सुप्रीम कोर्टात थोड्याच वेळात सुनावणी....

बाबो! प्राजक्ता माळीनं मुंबईत घेतलं तब्बल इतक्या कोटींचं घर, २८ व्या मजल्यावर आहे फ्लॅट

SCROLL FOR NEXT