School Bus Fire Sakal
पुणे

पुणे: शाळेच्या विद्यार्थांची टाटा मॅटीझ स्कूल बस जळून खाक

सुदैवाने प्रवास करणार्‍या व्यक्तींना आग लागल्याचे समजताच बाहेर पडल्याने बचावल्याने मोठी हानी टळली.

सावता नवले

कुरकुंभ : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील मळद हद्दीत सोमवारी ( ता. 21 ) दुपारी साडेबाराच्या सुमारास पुण्याकडे जाणार्‍या टाटा मॅटीझ या शाळेच्या विद्यार्थ्याची वाहतूक करणारी गाडी अचानक आग लागल्याने पूर्ण जळून खाक झाली. सुदैवाने प्रवास करणार्‍या व्यक्तींना आग लागल्याचे समजताच बाहेर पडल्याने बचावल्याने मोठी हानी टळली. (Pune solapur road vehicle fire accident)

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून टाटा मॅटीझ ही विद्यार्थ्यांची वहातूक करणारी गाडी ( एमएच. 12, जीझेड. 2725 ) पुण्याकडे जात होती. या गाडीला मळद हद्दीत अचानक आग लागली. या आगीत पूर्ण गाडी जळून खाक झाली. आग विझविण्यासाठी कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील अग्निशामक गाडी घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी आग विझवली. मात्र तोपर्यंत पूर्ण गाडी जळून खाक झाली होती. या गाडीमध्ये दोन व्यक्ती प्रवास करीत होत्या. या दोन्ही व्यक्तींना गाडीला आग लागल्याचे लक्षात येताच ते बाहेर पडले. त्यामुळे दोघांचे प्राण वाचल्याची माहिती घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी दिली. गाडीला अचानक लागलेल्या आगीचे कारण समजू शकले नाही.

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर यापूर्वीही खडकी, रावणगाव, मळद, कुरकुंभ हद्दीत वाहनांना अचानक आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. धावत्या वाहनाला आग लागण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रवाशांसाठी चिंतेचा विषय बनला. यासंदर्भात वाहन कंपन्यांनी आवश्यक उपाययोजन करण्याची व वाहनचालक, मालकांनी दक्षता बाळगणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT