पुणे

ज्येष्ठ नागरिकाची साडेचार लाखांची फसवणूक

CD

पुणे, ता. ८ : मतदारयादी दुरुस्ती अर्जात (एसआयआर फाॅर्म) चूक झाल्याची बतावणी करून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची चार लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी सायबर चोरट्यांवर अलंकार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे एका खासगी कंपनीतून निवृत्त झाले आहेत. ३० जुलैला सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर, ‘मतदारयादी दुरुस्तीचे काम सुरू असून, तुम्ही भरलेल्या अर्जात चूक झाली आहे,’ असा संदेश पाठविला. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर समाज माध्यमातून एक अर्ज पाठवून एपीके फाइल पाठविली. त्यामध्ये बँक खात्याची माहिती भरायला लावून त्यांच्या खात्यातून चार लाख ४३ हजार रुपये काढून घेतले. गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक स्मिता पाटील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: भेसळखोरांनो सावधान! दूध-पनीरनंतर आता मद्यावरही FDA वॉच ठेवणार; उत्पादन, लेबलिंगपासून भेसळीपर्यंत तपासणी होणार

Pune Dam Water : धरणे भरली, अन् चिंता मिटली; जिल्ह्यातील १३ धरणांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक साठा

Pune Metro : पुणे मेट्रो ३ साठी मुहूर्तच मिळेना; सर्व स्थानके कार्यान्वित होऊन मेट्रो धावेपर्यंत मार्च २०२७ उजाडणार

Sadanand Date : पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान वापर करून गुन्ह्यांचा तपास करावा

Nashik earthquake: नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के; 3.8 रिश्टर स्केलची तीव्रता

SCROLL FOR NEXT