पुणे

पात्र ज्येष्ठ वाहतूक चालकांना १० हजार रुपये सन्मान निधी

CD

पुणे, ता. १५ : राज्य सरकारच्या ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळा’मार्फत मंडळाच्या पात्र ज्येष्ठ सभासद चालकांना १० हजार रुपये सन्मान निधी देण्यात येत आहे. सर्व पात्र चालकांनी सभासदत्व स्वीकारावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे करण्यात आले.
कल्याणकारी योजनांची माहिती चालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे जिल्ह्यात जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी, कॅब, ॲपआधारित ओला-उबर वाहने, तसेच पर्यटन वाहनांच्या चालकांसाठी आरोग्य विमा व वैद्यकीय मदत, अपघाती विमा संरक्षण, तातडीची आर्थिक मदत, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, कौशल्यवृद्धी योजना आदी सुविधा उपलब्ध आहेत. नवीन ऑटो रिक्षा किंवा मीटर टॅक्सी, तसेच गृहखरेदीसाठी कर्ज सुविधा आणि ६५ वर्षांवरील पात्र चालकांसाठी निवृत्ती सन्मान योजनेंतर्गत सानुग्रह अनुदानाचीही तरतूद आहे.
एक जानेवारी २०२६ रोजी वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या व मंडळाचे सभासद असलेल्या पात्र चालकांना १० हजार रुपयांचा सन्मान निधी देण्यात येत आहे. पात्र चालकांनी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन सभासद नोंदणी करावी. सभासदत्वासाठी नोंदणी, ओळखपत्र शुल्क पाचशे रुपये आणि वार्षिक सभासद शुल्क तीनशे रुपये असे एकूण आठशे रुपये शुल्क आहे. अनुज्ञप्ती, बॅच, परवाना, आधार कार्ड, पॅन कार्ड व रेशन कार्ड आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT