पुणे

‘आपले सरकार’ केंद्रासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविले

CD

मंचर, ता. २३ : पुणे जिल्ह्यात नव्याने ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू करण्यासाठी इच्छुक पात्र व्यक्तींकडून जिल्हाधिकारी कार्यालयाने अर्ज मागविले आहेत. जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायती व नागरी भागात सेवा केंद्र उपलब्ध नाहीत, त्या ठिकाणी गुणवत्तेनुसार नवीन केंद्रांना मान्यता देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या शासन निर्णयानुसार सेवा केंद्रांचे वितरण, किमान पात्रता, पायाभूत सुविधा, मुलाखत व कार्यक्षमता यावर आधारित निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे. अर्जाचा नमुना व रिक्त जागांची यादी www.pune.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
इच्छुक उमेदवारांनी गुरुवार ३१ ऑगस्टपर्यंत सकाळी ११ ते संध्याकाळी ४ वेळेत संकेतस्थळावर अर्ज भरावा. आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील अर्जदारांनी जुन्नर-आंबेगाव (मंचर) उपविभागीय अधिकारी कार्यालयाशी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन आंबेगाव- जुन्नर विभागाच्या प्रांत अधिकारी अर्चना तांबे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Agitation Suspended : एमपीएससी विद्यार्थ्यांचे टिळक चौकातील आंदोलन स्थगित; उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निर्णय

MP Murlidhar Mohol : 'विकसित भारत’चा संकल्प प्रत्येक भारतीयाचा व्हावा; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

IMD Rain Alert : 16 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा, काही भागांत ताशी 75 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता, महाराष्ट्रातूनही मान्सूनच्या माघारीला पोषक स्थिती

Mithun Chakraborty: ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती पश्चिम बंगाल सरकारचे सल्लागार म्हणून नियुक्त; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा बहाल

Pune News : चारा टंचाईआधीच पशुसंवर्धन विभाग ‘अलर्ट’; पीक अवशेष जाळण्याऐवजी साठवणूक, प्रक्रिया आणि पोषणमूल्यवर्धनावर भर

SCROLL FOR NEXT