Dr Mohan Bhagwat sakal
पुणे

Pune News : सेवा हाच माणुसकीचा धर्म - सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

वाहत जाणे हा पाण्याचा धर्म आहे. त्याचप्रमाणे सेवा हाच माणुसकीचा धर्म आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

सकाळ वृत्तसेवा

वाहत जाणे हा पाण्याचा धर्म आहे. त्याचप्रमाणे सेवा हाच माणुसकीचा धर्म आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

पुणे - वाहत जाणे हा पाण्याचा धर्म आहे. त्याचप्रमाणे सेवा हाच माणुसकीचा धर्म आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. ‘सेवा भवन’ या बहुउद्देशीय सेवा प्रकल्पाचे उद्घाटन समारंभात ते बोलत होते.

रा.स्व.संघ जनकल्याण समिती, जनकल्याण सेवा फाउंडेशन आणि डॉ. हेडगेवार स्मारक सेवा निधी या संस्थांनी मिळून ‘सेवा भवन’ची निर्मिती केली आहे. कोथरूड परिसराती गांधी लॉन्स येथील उद्घाटन कार्यक्रमात पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नाना जाधव, समितीचे महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर, फाउंडेशनचे संचालक महेश लेले, डॉ. हेडगेवार सेवा निधी संस्थेचे कोषाध्यक्ष अभय माटे आदी उपस्थित होते.

यावेळी सरसंघचालकांच्या हस्ते जनकल्याण समितीच्या ५० वर्षांचा आढावा घेणाऱ्या ‘अहर्निशं सेवा महे’ या ग्रंथाचे प्रकाशन आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र मालशे यांचा सत्कारही करण्यात आला. डॉ. भागवत म्हणाले, ‘‘स्वतःच्या परिश्रमापेक्षा अनंतपट समाजाचे ऋण आपल्यावर असते. त्यामुळे सेवा हे आपले कर्तव्य आहे. एकांतात आत्मसाधना आणि लोकांतात परोपकार सेवा हीच साधना आहे.

सर्वांग सुंदर अशा समाजाकडून जगाची सर्व प्रकारची सेवा सामर्थ्याने आणि सद्भावनेने होईल. त्यातून विश्वशांतीचे साम्राज्य जगावर उभे राहील.’’ जनकल्याण समितीच्या कार्याची माहिती देताना साताळकर म्हणाले, ‘१९७२च्या दुष्काळात सेवाकार्यासाठी स्वतंत्र स्थायी विभाग केला पाहीजे असे लक्षात आले. त्यातूनच आज ८० हून जास्त सेवा प्रकल्प आणि ३२०० सेवावर्ती लोक कार्य करतात.

समितीचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून, आठ मजल्यांचे सेवाभवन उभे राहीले आहे. रूग्णांच्या नातेवाईकांसाठी चांगली राहण्याची सोय, दीडशे लोकांचे निवास आणि भोजन, २० डायलेसिस युनिटद्वारे रोज ६० रूग्णांचे डायलिसीस अल्पदरात होणार. रूग्णांच्या नातेवाईकांच्या समुपदेशनाचे कार्य, सेवाभावी संस्थांच्या कार्यकर्ता प्रशिक्षणाचे सभागृह आणि प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे.’ तुकाराम नाईक यांनी परिचय, विनायक डंबीर यांनी प्रकल्पाची माहिती तर उमा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

पापक्षालन करून घ्या...

हजारो वर्षांच्या आक्रमणग्रस्त परिस्थितीमुळे ज्या समाज बांधवांकडे आपले दुर्लक्ष झाले. तो समाज आता आपल्या समोर येत आहे. आणि म्हणतो आहे की, ते जे चुकलं ते दुरूस्त करून घ्या. जे काही पाप अजाणता परिस्थितीमुळे तुमच्या हातून झाले, त्याचे क्षालन करून घ्या. या भावनेने सेवा चालते, असा सल्ला डॉ. भागवत यांनी दिला.

सरसंघचालक डॉ. भागवत म्हणाले...

- संवेदनशील अंतकरणाचे सर्वच लोक सेवा करतात

- स्वार्थ, अपरिहार्यता आणि भितीपोटी कोणतिही सेवा होऊ शकत नाही

- मानवी मनातील संवेदना हे अस्तित्वाच्या एकतेचे स्वरूप आहे

- मिळविणाऱ्या पेक्षा वाटणाऱ्याची सन्मान करण्याची परंपरा

- शिवभावे जीवसेवा, समरसता आणि सद्भावना आवश्यक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटनास बंदी

SCROLL FOR NEXT