Pune Porsche Accident Esakal
पुणे

Pune Porsche Accident : पुणे कार अपघातप्रकरणी पुणे सत्र न्यायालयाचा निर्णय; विशाल अग्रवालसह तिघांना २४ मेपर्यंत पोलीस कोठडी

Pune Porsche Accident : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या भीषण अपघाताप्रकरणी आज अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या भीषण अपघाताप्रकरणी आज अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विशाल अग्रवाल यांना २४ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्यासह बार मालक, व्यवस्थापक नितेश शेवानी आणि जयेश गावकरे यांना सुद्धा २४ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पुणे सत्र न्यायालयने आज या चार जणांना कोठडी सुनावली आहे. १९ तारखेला पुण्यातील कल्याणीनगर भागात भीषण अपघात झाला होता. या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला होता.

कोर्टात काय झाला युक्तीवाद?

विशाल अग्रवाल यांना चौकशीसाठी पुणे पोलिसांकडून 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली होती. मात्र, न्यायालयाने ती अमान्य करत विशाल अग्रवालसह अन्य तीन आरोपींना 24 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुलगा अल्पवयीन असतानाही त्याला कार चालवायला दिली तसेच तो दारू पितो हे माहिती असतानाही त्याला पार्टीला जाण्यास परवानगी दिली. या कारणांमुळे विशाल अग्रवाल यांच्यावर बाल न्याय अधिनियमाच्या 75 आणि 77 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अल्पवयीन मुलाला रेस्टॉरंटमध्ये मद्य देणाऱ्या रेस्टॉरंटसह त्याच्या वडिलांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत बोलताना वकिल असीम सरोदे म्हणाले, विशाल अग्रवाल यांनी मुलाकडे लक्ष दिलं नाही. गाडीचे रजिस्ट्रेशन केलेले नव्हते. गाडीवरती नंबर टाकण्यात आलेला नव्हता. आपल्या मुलाकडे परवाना नाही हे माहिती असतानाही त्यांनी मुलाला गाडी चालवायला दिली. मुलाचं वय १८ वर्ष नसताना त्याला बार, पबमध्ये जाऊ देणं, हे देखील चांगल्या पालकांचं लक्षण नाही. त्यामुळे ज्युवीनाईल जस्टीस अॅक्टनुसार त्यांनी आपल्या मुलाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळे हा अपघात घडलेला आहे. त्यामुळे न्यायालयाने त्याच्या वडिलांना २४ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

SCROLL FOR NEXT