mohol murlidhar
mohol murlidhar sakal
पुणे

पुणे : समाविष्ट गावातील मैलापाणी प्रकल्प चार वर्षात पूर्ण करणार; मुरलीधर मोहोळ

सकाळ वृत्तसेवा

११ गावांमधील ३५० कोटी रुपयांच्या मलवाहिनी आणि मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन मोहोळ यांच्या हस्ते झाले.

पुणे - 'समाविष्ट गावांना (Villages) मुलभूत सोयीसुविधा पुरवण्यासाठी पुणे महापालिका (Pune Municipal) कटिबद्ध आहे. या अंतर्गत समाविष्ट ११ गावांसाठी मैला वाहिनी आणि मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प (Sewage purification project) साकारण्यात येत असून, तो चार वर्षांत पूर्ण होईल. या गावांमध्ये पायाभूत सुविधा सक्षमपणे उभ्या करण्यास आम्ही प्राधान्य देत आहोत, असे महापौर मुरलीधर मोहोळ (murlidhar mohol) सांगितले.

११ गावांमधील ३५० कोटी रुपयांच्या मलवाहिनी आणि मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन मोहोळ यांच्या हस्ते झाले. उपमहापौर सुनीता वाडेकर, आमदार भीमराव तापकीर, स्थायी समितीचे अध्यक्ष अध्यक्ष हेमंत रासने, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, नगरसेविका अश्विनी पोकळे, गणेश ढोरे, हरिदास चरवड, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार, अधीक्षक अभियंता जगदीश खानोरे आदी उपस्थित होते.

महापौर मोहोळ पुढे बोलताना म्हणाले, "उत्तमनगर, धायरी, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, उंड्री, उरुळी देवाची, फुरसुंगी, मुंढवा (उर्वरित केशवनगर), हडपसर (संपूर्ण साडेसतरानळी), लोहगाव, मांजरी बुद्रुक या गावांचा समावेश आहे. १८२ किलोमीटर लांबीची मलवाहिनी विकसित करण्यात येत आहे. मुंढवा येथे १२ एमएलडी क्षमतेचा आणि मांजरी बुद्रुक येथे ९३.५ एमएलडी क्षमतेचे दोन मैलापाणी शुद्धीकरण केंद्र बांधण्यात येतील. गावांचा विकास करताना तो नियोजनबद्ध आणि भविष्याच्या गरजा लक्षात घेऊनच करत आहोत, असे मोहोळ यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT