पुणे

पुणे : शेवाळेवाडी फाट्यावरील चेंबर दुरुस्तीला मुहूर्त कधी?

सोलापूर रस्त्यावर शेवाळेवाडी फाटा चौक येथे मलवाहिनीतील चेंबरमधील दुर्गंधीयुक्त पाणी मागिल दोन दिवसांपासून सोलापूर रस्त्यावर वाहत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सोलापूर रस्त्यावर शेवाळेवाडी फाटा चौक येथे मलवाहिनीतील चेंबरमधील दुर्गंधीयुक्त पाणी मागिल दोन दिवसांपासून सोलापूर रस्त्यावर वाहत आहे. दुर्गंधीयुक्त पाण्यातून शेवाळेवाडीकर ये-जा करीत आहेत. या चौकात पीएमपीचा बसथांबा असल्याने प्रवाशांना दुर्गंधीयुक्त पाण्यातून बसमधून उतरावे आणि बसमध्ये चढावे लागत आहे, या चेंबर दुरुस्ती करण्यासाठी डझनभर नेते आणि प्रशासन मुहूर्त शोधत आहेत की काय, असा संतप्त सवाल सामान्यजनांनी उपस्थित केला आहे.

शेवाळेवाडी गाव महापालिकेमध्ये समाविष्ट झाले आहे. पालिकेने नामफलक लावण्याचे काम इमानेइतबारे केले. मात्र, देखभाल दुरुस्ती करण्यासाठी पुढाकार कधी घेणार, त्यासाठी आंदोलनाचाच पवित्रा घ्यावा लागणार का, दुर्गंधीयुक्त पाण्यात पाय घसरून पडल्यानंतर प्रशासन जागे होणार का, असे एक ना अनेक संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केले आहेत.

कोरोना महामारीतून आता कुठे सावरलो आहोत, तर चेंबरच्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे बसथांब्यावर उभे राहणेही नकोशे झाले आहे, असे रामचंद्र भोसले यांनी सांगितले.

महापालिकेच्या कारभारापेक्षा आमची ग्रामपंचायत बरी होती, असे म्हणण्याची वेळ आता येथील नागरिकांवर येऊन ठेपली आहे. ग्रामपंचायतीच्या कारकीर्दीत अशी वेळ कधी आली नव्हती, अशी टिपण्णीही बसथांब्यावरील प्रवाशांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Accident: 71 वर्षीय माजी खासदारानं दुचाकीला उडवलं, BMC कर्मचाऱ्याचा मृत्यू तर पत्नी गंभीर; गुन्हा दाखल

Nagpur Car Accident : कार नाल्यात पडून विवाहितेचा मृत्यू वर्धा मार्गावरील घटना; पतीसह पाच वर्षीय मुलगा जखमी

IND vs SL Semi Final : वैभव, संजू, अभिषेक Playing XI मध्ये! टीम इंडियाने उपांत्य फेरीत उतरवला तगडा संघ; ओपनिंगला कोण?

Latest Marathi News Live Update : सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी भाजप आमदार पडळकर, खाडेंसह ६४ अर्ज दाखल; अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

Chha. Sambhajinagar Drought : दुष्काळानं माझा लेक न्येला... त्याची राख बगून काळीज फाटतं हो ; आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याच्या मातेची काळीज पिळवटून टाकणारी भावना

SCROLL FOR NEXT