pune shimla office metro work traffic changes know alternative route Sakal
पुणे

Pune Traffic : मेट्रोच्या कामामुळे सिमला ऑफिस चौकात वाहतुकीत बदल

शहरातील सिमला ऑफिस चौकाजवळ मेट्रो स्टेशनच्या गर्डर लाँचिंग आणि पिलरचे काम सुरू करण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरातील सिमला ऑफिस चौकाजवळ मेट्रो स्टेशनच्या गर्डर लाँचिंग आणि पिलरचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सिमला ऑफिस चौक परिसरात शनिवारपासून (ता. ४) वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात येणार आहे.

वाहनचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केले आहे. वीर चाफेकर चौक ते न.ता. वाडी के.व्ही. जोशीमार्ग चौक ते सिमला ऑफिस चौक (एस. टी. स्टँड मार्ग) हा मार्ग सर्व वाहनांसाठी एकेरी करण्यात येत आहे. वीर चाफेकर उड्डाण पुलावरून सिमला ऑफिस चौकाकडे प्रवेश बंद राहील.

पर्यायी मार्ग : चाफेकर उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूकडील सेवा रस्त्यावरून चाफेकर चौक डावीकडे वळण घेऊन - न.ता.वाडी उजवीकडे वळण घेऊन सिमला ऑफिस चौक.

फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरून वीर चाफेकर चौकातून सिमला ऑफिस चौकामध्ये जाण्यास प्रवेश बंद राहील. पर्यायी मार्ग - चाफेकर चौक- सरळ न.ता. वाडी चौकातून उजवीकडे वळण घेऊन सिमला ऑफिस चौक.

न.ता. वाडी चौक ते चाफेकर चौक प्रवेश बंद राहील.

पर्यायी मार्ग : न.ता. वाडी चौकातून डावीकडे वळून सिमला ऑफिस चौक- उजवीकडे वळण घेऊन चाफेकर चौक.

स.गो. बर्वे चौकाकडून येऊन सिमला ऑफिस चौकातून शिवाजीनगर रेल्वे स्टेशनकडे प्रवेश बंद राहील.

पर्यायी मार्ग : सिमला ऑफिस चौक-डावीकडे वळून चाफेकर चौक-उजवीकडे न.ता. वाडी चौक उजवीकडे वळून शिवाजीनगर रेल्वे स्टेशन.

शिवाजीनगर रेल्वे स्टेशनकडून एस.टी. स्टैंड सर्कलवरुन न. ता. वाडीकडे जाण्यास प्रवेश बंद राहील. सिमला चौकातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे जाणाऱ्या वाहनांनी एल. आय. सी कडील बाजूने चाफेकर उड्डाण पुलावरून जावे. वीर चाफेकर चौक ते न.ता. वाडी. चौक ते सिमला ऑफिस रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना नो पार्किंग करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : '7 महिन्यांच्या गरोदर महिलेवर लैंगिक अत्याचार, नजर लागते म्हणून करायचा विशिष्ट विधी'; SIT तपासात धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Live Update : कल्याणमध्ये काँग्रेसची संघटन मजबुतीसाठी बैठक; जिल्हाध्यक्ष पदासाठी चार नेते इच्छुक

Viral Video : शिक्षण आहे की व्यवसाय? इयत्ता दुसरीच्या पुस्तकांसाठी मोजावे लागले ९,००० रुपये; पालकाने मांडली व्यथा, व्हिडिओ व्हायरल

Hi Dear असा एक मेसेज अन् तुमचं बँक अकाऊंट होईल रिकामं; मोबाईल हॅक, नवा सायबर फ्रॉड नेमका आहे तरी काय? पाहा

गुन्हा कबूल केलाय, तक्रारदाराची तक्रारच संशयास्पद; खरातच्या वकिलांनी कोर्टात काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT