धुलवड  sakal
पुणे

Pune : शिरदाळे येथे पारंपरिक पद्धतीने प्रतीकात्मक वीर देवांच्या मिरवणुका काढुन धुलवड साजरी

तालुक्याच्या पुर्वभागातील शिरदाळे या गावात वर्षातील सर्व सण व उत्सव गावातील सर्व ग्रामस्थ

सुदाम बिडकर ः सकाळ वृत्तसेवा

पारगाव : शिरदाळे ता. आंबेगाव येथे गेली अनेक वर्षापासुन चालत आलेल्या परंपरेनुसार होळी सणाच्या दुसऱ्या दिवशी काल मंगळवारी धुलीवंदनाच्या दिवशी पारंपारिक पध्दतीने लहान मुलांना महाभारत, रामायण व पौराणिक पध्दतीची वेशभुषा करुन विरांचा पाडवा उत्साहात साजरा करण्यात आला.

तालुक्याच्या पुर्वभागातील शिरदाळे या गावात वर्षातील सर्व सण व उत्सव गावातील सर्व ग्रामस्थ एकत्रीत पारंपारिक पध्दतीने साजरे केले जातात विराचा पाडवा साजरा करताना गावातील लहान मुलांना चाफ्यांच्या फुलांसह माळरानावरील विविध रंगाच्या पान फुलांचे हार

घालुन त्यांना सजवुन आकर्षक वेशभुषा करुन त्या सर्व प्रतिकात्मक विरांची गावातुन मिरवणुक काढण्यात आली काही तरुण तसेच जेष्ठांनी विविध प्रकारची पारंपारिक सोंग आणुन या कार्यक्रमाचा आनंद व्दिगुणित केला.

धूलिवंदन सण साजरा करुन गावात एकोप्याचे दर्शन घडविले दोनशे वर्षांपेक्षा जास्त वर्षाची परंपरा असलेला धुलिवंदन सण यावर्षी देखील पारंपरिक पद्धतीने साजरा झाला. पारंपरिक वाद्यांच्या तालात गावच्या वेशीतून वीर देवांची भव्य मिरवणूक काढून त्यांची पूजा करून तळी भंडार करण्यात आला. गावातील लहान मुलांना

देवाचा वेष परिधान करून त्याची मिरवणूक काढली जाते त्यानंतर गावच्या चौकात जेष्ठ मंडळी आपल्या जुन्या आठवणी जागवताना घाई धरून ढोल लेजिम खेळले जाते आणि मग सर्व देवांना घरी नेऊन घरातील महिला त्यांची पूजा करून कार्यक्रमाची सांगता केली जाते.

याहीवर्षी धुलवड हा सण अतिशय आनंदात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. सकाळी संतोष महाराज बढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली असणारी श्री. ज्ञानेश्वर मंदिर (बढेकर मळा) ते श्री.क्षेत्र देहू पायी दिंडी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले यावेळी हनुमान भजनी मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते.

दुपारी चार वाजता वीर देवांच्या मिरवणुका निघाल्या. पारंपारिक वाद्यांच्या व सनईच्या सुरात वीर देवांना गावच्या हनुमान चौकात आणण्यात आले. या कार्यक्रमाला गावातील सर्व जेष्ठ मंडळी,सर्व महिला,लहान मुले मोठ्या उत्साहात सहभागी झाली होती . यावेळी उपसरपंच मयुर सरडे, ग्रामपंचायत सदस्य बिपीन चौधरी ,कोंडीभाऊ तांबे, जयदीप चौधरी ,विशाल रणपिसे, सखाराम तांबे, रंगनाथ रणपिसे आणि गावातील अनेक बुजुर्ग मंडळी उपस्थित होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Overhead Cable Action: अनधिकृत ओव्हरहेड केबलवर महापालिकेची धडक कारवाई कायम; इंटरनेट बंद पडल्याने ‘वर्क फ्रॉम होम’ नोकरदारांची तारांबळ

Pune News: शाळेतील फी वाढ अन्यायकारक! पुण्यात पालकांचं आंदोलन; मनसेच्या आंदोलकांनी केली पैशांची उधळण

Latest Marathi News Live Update : जय पवार यांनी बांधावर जाऊन केली नुकसानीची पाहणी

Pune Civic Negligence: पुण्यात बेमोसमी पावसानंतर धुळीचे लोट, रस्त्यावर खडी-मातीचा ढिगारा; महापालिका, ठेकेदारांच्या निष्क्रियतेने नागरिक हैराण

IPL 2026 : मुंबई इंडियन्सची हार अन् कर्णधार सूर्यकुमार यादवने कुणावर फोडले खापर? म्हणतो कसा...

SCROLL FOR NEXT