accident 
पुणे

चहा पिण्यासाठी रस्ता ओलांडताना मोटारीच्या धडकेने दोघे ठार 

नितीन बारवकर


शिरूर (पुणे) : पुणे - नगर रस्त्यावर कारेगाव (ता. शिरूर) येथील फलके मळा येथे चहापाण्यासाठी रस्ता ओलांडणाऱ्या दोघांचा भरधाव मोटारीच्या धडकेने जागीच मृत्यू झाला. गुरुवारी (ता. 29) रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. 

शंकर भगवान सावंत (वय 26, रा. वाडेबोल्हाई, ता. हवेली) व भैरव शिवाजी सांगोलकर (वय 27, रा. न्हावी सांडस, ता. हवेली) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. ते मूळचे आंबेजवळगा (ता. जि. उस्मानाबाद) येथील रहिवासी असून, ऊसवाहतुकीच्या कामानिमित्त सध्या वाडेबोल्हाई व न्हावी सांडस येथे राहात होते.

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी या अपघाताची नोंद केली असून, मोटारचालक विक्रम भाऊसाहेब नवले (रा. फलकेमळा) याला ताब्यात घेतले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर सावंत व भैरव सांगोलकर हे आपल्या ट्रॅक्‍टरमधून जनावरांसाठी उसाचे वाढे घेऊन मूळ गावी चालले होते. फलकेमळ्याजवळ रस्त्याच्या कडेला ट्रॅक्‍टर उभा करून चहापाण्यासाठी रस्त्याच्या पलीकडे जात असताना शिरूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव मोटारीची (क्र. एमएच 12 एलव्ही 4260) त्यांना धडक बसली. त्यात त्यांच्या हातापायाला व डोक्‍याला गंभीर मार लागला.

फलकेमळा चौकात रुग्णवाहिका घेऊन उभ्या असलेल्या नानासाहेब तबाजी पोटे यांनी या अपघाताची खबर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक शुभांगी कुटे यांच्यासह किशोर तेलंग, गणेश सुतार व मंगेश थिगळे या पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन जखमी अवस्थेतील सावंत व सांगोलकर यांना पोटे यांच्या रुग्णवाहिकेतून कारेगाव येथील खासगी दवाखान्यात नेले. तथापि, तेथील डॉक्‍टरांनी उपचारापूर्वीच सावंत व सांगुलकर यांना मृत घोषित केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : अल्पवयीन मुली बेपत्ता प्रकरणे वाढली; मानवी तस्करी रोखण्यासाठी संसदेत आवाज

IPL 2026 Marathi News: मी माफी मागतो...! इंग्लंडच्या स्टार फलंदाजाची आयत्यावेळी माघार, हॅरी ब्रूकनंतर त्याच्यावरही होणार बंदीची कारवाई

Pune News : ‘पीटीपी’ अ‍ॅपमुळे वाहतूक शिस्तीत सुधारणा; अडीच लाख तक्रारींवर ९.३२ कोटींचा दंड

Latest Marathi News Live Update : खरातप्रकरणी तपासामध्ये काही प्राण्यांचे अवयव मिळून आले- पीडितेचे वकील

Solapur News : सावळेश्वर टोल नाक्यावर चालकाला बेदम मारहाण; वाहतूक ठप्प, तणावाचे वातावरण

SCROLL FOR NEXT