tanaji savant esakal
पुणे

पुणे : शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या गाडीचा वरवंड येथे अपघात

सुदैवाने यामध्ये कोणालाच कसलीच इजा झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

अमर परदेशी, वरवंड

पुणे सोलापुर महामार्गावर वरवंड (ता.दौंड) येथे उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या लॅन्डक्रुझर कारगाडीचा अपघात झाल्याची घटना घडली.सुदैवाने यामध्ये कोणालाच कसलीच इजा झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

याबाबत पोलिसांनी माहीती दिली.शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत ,सोनबा देवकाते तसेच त्यांच्या सोबत काही कार्यकर्ते कारगाडीतुन उस्मानाबाद येथुन पुणे सोलापुर महामार्गाने पुण्याकडे जात होते.शनिवारी (ता.४) रात्री अकरा वाजता वरवंड (ता.दौंड) हद्दीतुन जात असतानाना कौठीचा मळा येथे समोरील कंटेनर चालकाने बेजाबदारपणे कंटेनर अचानक दुसऱया बाजुला घेतला.त्यावेळी आमदार सावंत यांची गाडी व कंटेनरची धडक होवून अपघात झाला.यामध्ये कारगाडीचे काही प्रमाणात नुकतान झाले.

मात्र,यामध्ये गाडीतील कोणालाच जखमी किंवा इजा झाली नाही. माहीती मिळताच पाटस व महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.अपघातग्रस्त वाहनांना बाजुला घेतले. कारगाडीचे चालक सोनबा देवकाते यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे यवत पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal Acquitted : निलेश घायवळसह सहा आरोपींची निर्दोष मुक्तता; मोका न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Bank Holiday October 2026: ऑक्टोबरमध्ये बँका 16 दिवस बंद! महाराष्ट्रात किती दिवस सुट्टी? पाहा RBIची संपूर्ण यादी

Marathi News Live Updates: दुष्काळाने ऊसही कडू केला; दिवाळी तोंडावर असताना महिला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, जनावरांच्या चाऱ्यासाठी उभा ऊस विकण्याची वेळ

Oppo K14 Plus 5G स्मार्टफोन लाँच; 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 45W फास्ट चार्जिंगचा धुमाकूळ! पहा किंमत...

Childhood Cancer Symptoms : मुलाला येणारा ताप केवळ सामान्य ताप नसू शकतो; पालकांनी 'या' धोक्याच्या घंटा कधी ओळखाव्या? तज्ज्ञांनी दिला गंभीर आजाराचा इशारा

SCROLL FOR NEXT