जम्बो कोवीड sakal media
पुणे

Pune News : शिवाजीनगर येथील जम्बो कोवीड रुग्णालय बंद

शहरातील रुग्णसंख्या कमी झाल्याने निर्णय

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरातील रुग्णसंख्या कमी झाल्याने शिवाजीनगर येथील जम्बो कोवीड रुग्णालय बंद केले आहे, पण भविष्यात गरज पडल्यास त्वरित सुरू करण्याची महापालिकेची तयारी आहे, अशी माहिती आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी दिली.

शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने महापालिकेने जम्बो रुग्णालय, दळवी रुग्णालयातील कोरोना उपचार बंद केले आहेत. मात्र, सध्या दक्षीण आफ्रिकेतील ओमायक्रॉन हा कोरोनाचा विषाणू वेगात संक्रमित होत असल्याने केंद्र सरकार, राज्य सरकार सतर्क झाले आहे. आवश्यकतेनुसार निर्बंध लावले जात आहेत. पुणे महापालिकेनेही आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी तयारी ठेवली आहे. महापालिकेचे रुग्णालय, तेथील बेड, व्हेंटिलेटर, आयसीयू याची तपासणी सुरू केलेली आहे.

डॉ. भारती म्हणाले, ‘‘शहरात कोरोनाची स्थिती सामान्य आहे, पण गरज पडल्यास महापालिका दोन दिवसात जम्बो रुग्णालय पुन्हा सुरू करू शकते अशी तयारी आहे. रुग्ण संख्या कमी झाल्याने जम्बो रुग्णालयात बंद केले आहे. पण तेथे सर्व उपकरणे, बेड तेथेच आहे. रुग्णालयाचे शेड देखील चांगल्या स्थितीत आहे. त्यामुळे महापालिकेला नव्याने तयारी करावी लागणार नाही, केवळ संबंधित एजन्सीला आदेश देऊन पुन्हा डॉक्टर, नर्स उपलब्ध होतील.

आफ्रिकेतून आलेल्या नागरिकाची तपासणी -

पुण्यात काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून एक नागरिक पुण्यात आला आहे. महापालिकेने त्याची आरटीपीसीआर चाचणी केली असून, त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. जर या प्रवाशाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, त्यामध्ये ओमायक्रॉन हा नवा विषाणू आहे की नाही हे तपासण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंग करावे लागणार असल्याची माहिती सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली.

कोरोनाच्या नव्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका सज्ज आहे. आफ्रिका, आॅस्ट्रिया, जर्मनी, झिम्बाब्वे या देशातून नागरिक पुण्यात आल्यास त्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाकडून घेण्यात येईल. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अशा नागरिकांना लक्षणे नसली तरी त्यांची आरटीपीसीआर तपासणी केली जाणार आहे.

डॉ. वावरे म्हणाले, लसीकरणाचे प्रमाण कमी असलेल्या देशांमध्ये ओमायक्रॉन विषाणूची लागण झाली आहे. या देशांमधून जे नागरिक पुण्यात येतील त्यांची तपासणी केली जाईल. पण ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, ते अशांना जास्त धोका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT