Gajanan Kirtikar Sakal
पुणे

पुण्यात शिवसेनेला पुन्हा उभे करणार - गजानन कीर्तिकर

बाळासाहेबांची शिवसेना गटाचे नेते व खासदार गजानन कीर्तिकर यांनी पुण्यातील संघटन बांधणीवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे सुचित केले.

सकाळ वृत्तसेवा

बाळासाहेबांची शिवसेना गटाचे नेते व खासदार गजानन कीर्तिकर यांनी पुण्यातील संघटन बांधणीवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे सुचित केले.

कोथरूड - शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग पुण्यात आहे. मला पुन्हा पुणे उभे करायचे आहे अशा शब्दात बाळासाहेबांची शिवसेना गटाचे नेते व खासदार गजानन कीर्तिकर यांनी पुण्यातील संघटन बांधणीवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे सुचित केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्यानंतर कीर्तिकर यांनी प्रथमच कोथरूड मध्ये पत्रकारांशी संवाद साधला. बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या युवा सेनेच्या वतीने कीर्तिकर यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला. यावेळी कीर्तिकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख प्रमोद भानगिरे, महाराष्ट्र राज्य युवा सेना सचिव किरण साळी, अजय बापू भोसले व शहराचे उपप्रमुख व युवा सेना पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

स्वतःच्या हिमतीने जे कार्यकर्ते शिंदे गटात आले आहेत त्यांनी मला सांगितले की, तुम्ही आलात आम्हाला बळ मिळाले. पुण्यात शिवसेनेचा अवशेष राहीला नाही हा गैरसमज आहे. असे सांगत कीर्तिकर यांनी पुणे जिल्ह्यात संघटन बांधनीत लक्ष देणार असल्याचे सांगितले.

शिवसेनेचा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबतचा प्रवास घातक असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचा पुनर्ऊच्चार करत कीर्तिकर म्हणाले की, बाळासाहेबांच्या नेतृत्वात काम करताना आम्ही संघटनेला वाहून घेतले. बाळासाहेबांनी देखील कार्यकर्त्यांची क्षमता ओळखत प्रत्येकाला योग्य वेळी संधी दिली.

कीर्तिकर पत्रकारावर भडकले

तुम्ही निष्ठावंत आहात का? या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर भडकलेल्या कीर्तिकरांनी, तु पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहेस का? असा प्रतिप्रश्न केला? पत्रकार परिषदेत पत्रकारांनी सोयीचे प्रश्न विचारावेत असे गृहीत राजकारणी धरू लागलेत. त्यामुळे पत्रकारांनी एखादा बोचरा प्रश्न विचारताच राजकीय नेते आगपाखड करताना दिसत आहेत.

  • संजय राऊत यांना वाढदिवसानिमित्त तीन तीन वेळा फोन केले पण त्यांनी फोनच उचलला नाही. अखेर त्यांना मेसेज केला.

  • संजय राऊतांवर असलेला आरोप फार किरकोळ आहे.

  • आमच्या पक्षाचे काय होईल असे सांगणा-या संजय राऊत, विनायक राऊत यांचे पुढील निवडणूकीत काय होईल ते त्यांना विचारा.

  • संजय निरूपमने सांगितले म्हणून मी राजीनामा देणार नाही. माझ्याविरुद्ध उभे रहायला सांगा पावणेतीन नव्हे पावणेचार लाखाच्या फरकाने मी विजयी होईल.

  • प्रियंका चतुर्वेदी यांना खासदारकी देणे संघटनेच्या विरोधात होती.

  • जे आमदार माझ्यामुळे शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत त्यांनाही मी शिस्त लावणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: शासनाची मोठी कारवाई! ‘लाडक्या बहिणी’ कायमच्या अपात्र; घेतलेले पैसेही परत द्यावे लागणार, पण कुणाला?

Sports: क्रिकेटपटू भाविका अहिरे अंडर १९ महिला संघाच्या कर्णधारपदी; दोंडाईचाचे आजोळ, नाशिकची कन्या

Nanded: कोरोनात आई-वडिलांचे छत्र हरपले; जिद्दीने वैष्णवी बनली डॉक्टर, मेहनतीच्या जोरावर एमबीबीएस केलं पूर्ण

आमची बाळं कुठं आहेत? घरातल्या कुणाशीच चेहरा जुळेना; IVFद्वारे जुळ्या मुलींचा जन्म, DNA रिपोर्ट पाहून दाम्पत्याला धक्का

Latest Live Updates Marathi: पाच कोटींच्या खंडणीसाठी गुत्तेदाराचे अपहरण; मुख्य अभियंत्याच्या चालकासह चौघे जेरबंद

SCROLL FOR NEXT