Uddhav Thackeray and Eknath Shinde Sakal
पुणे

Pune News : शिवसेनेच्या ठाकरे व शिंदे गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी एकमेकांना भिडले; घोषणाबाजी व धक्काबुक्की

निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला शिवसेना नाव व चिन्ह देण्याच्या दुसऱ्याच दिवशी शनिवारी दुपारी पत्रकार भवन येथे शिवसेनेच्या ठाकरे व शिंदे गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी एकमेकांना भिडले.

सकाळ वृत्तसेवा

निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला शिवसेना नाव व चिन्ह देण्याच्या दुसऱ्याच दिवशी शनिवारी दुपारी पत्रकार भवन येथे शिवसेनेच्या ठाकरे व शिंदे गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी एकमेकांना भिडले.

पुणे - निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला शिवसेना नाव व चिन्ह देण्याच्या दुसऱ्याच दिवशी शनिवारी दुपारी पत्रकार भवन येथे शिवसेनेच्या ठाकरे व शिंदे गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी एकमेकांना भिडले. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी एकमेकांसमोर आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळी दोन्ही गटात धक्काबुक्की सुरू झाली. दरम्यान, पोलिसांनी तत्काळ कार्यकर्त्यांना बाजूला करून वादावर नियंत्रण मिळविले.

निवडणूक आयोगाने शुक्रवारी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देत शिवसेना नाव व त्यांचे धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. त्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात विरोध दर्शविण्यात आला. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी एका वृत्तवाहिनीने शहरातील ठाकरे गटाचे संजय मोरे, गजानन थरकुडे यांच्यासह महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना बोलावले, तसेच शिंदे गटाच्या संजय अगरवाल, अजय भोसले यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ही बोलावून घेतले.

दरम्यान, दोन्ही गटांचे शहर पातळीवरील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी शनिवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास पत्रकार भवन येथे जमले. त्यावेळी आत्तापर्यंतच्या प्रकारामुळे आगोदर संतप्त असलेल्या ठाकरे गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या रागात भर पडली. त्यांनी शिंदे गटा विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळी शिंदे गटातील कार्यकर्ते व पदाधिकारीही त्यांच्यासमोर आले. त्यावेळी त्यांच्यात जोरदार घोषणाबाजी व धक्काबुक्की झाली. सुमारे अर्धा तास हा सर्व प्रकार सुरू होता. याची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही गटांच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना एकमेकांपासून दूर नेले..त्यानंतर हा वाद निवळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT