पुणे

आंदगावमध्ये बाचाबाचीतून दोघांवर गोळीबार

CD

पिरंगुट, ता. १ : आंदगाव (ता. मुळशी) येथे किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीत दोघांवर गोळीबार केल्याची घटना घडली. शनिवारी (ता. ३१) रात्री सव्वाअकरा वाजता घडलेल्या या प्रकरणात सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील चारजणांना अटक केली असून, दोघे फरारी आहेत.
याबाबत शुभम एकनाथ शिंदे (वय २७, सध्या रा. भूगाव, ता. मुळशी; मूळ गाव वातुंडे, ता. मुळशी) याने पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अभिषेक विकास मारणे (वय २२, रा. कार्ले चौक, नांदेड फाटा, सिंहगड रोड, पुणे), रामभाऊ बबन मरगळे (वय २९. रा. नांदेड फाटा, सिंहगड रोड), विजय विठ्ठल मरगळे (वय ३४, रा. नांदेड गाव, धनगर वस्ती, सिंहगड रोड, पुणे), बाळू अंकुश ढेबे (वय २७, रा. नांदेड गाव, धनगर वस्ती, सिंहगड रोड) या चार जणांना अटक केली असून, संतोष रामभाऊ बावधने व अनिकेत संदीप ढेबे (दोघेही रा. नांदेड गाव, सिंहगड रोड) हे फरारी आहेत. आरोपींकडून गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त केले आहे.
याबाबत पौड पोलिसांनी माहिती दिली की, शनिवारी (ता. ३१) आंदगाव येथील पुणे- लवासा रस्त्यावरील बसथांब्याजवळ ही घटना घडली आहे. फिर्यादी शुभम शिंदे याच्या बरोबर झालेल्या किरकोळ भांडणावरून अभिषेक मारणे याने शुभम शिंदे व धनंजय शिंदे या दोघांवर बंदुकीने गोळीबार केला. अभिषेक सोबत असलेला आरोपी रामभाऊ मरगळे याने बंदुकीच्या गोळ्या संपल्याने धनजय शिंदे याच्या डोक्यावर बंदुक मारून त्याला जखमी केले. अभिषेक सोबत असलेले आरोपी विजय विठ्ठल मरगळे, बाळू अंकुश ढेबे, संतोश रामभाऊ बावधने व अनिकेत संदीप ढेबे यांनी शुभम शिंदे व धनंजय शिंदे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच, शुभमची वॅगनार मोटाराची (क्र. एमएच १२ एमडब्ल्यू ९४१७) समोरील काच फोडून नुकसान केले व आजूबाजूच्या परिसरातील भागात दहशत निर्माण केली. याबाबत वरिष्ठ निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सुधीर कदम पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: कपडे फाटेपर्यंत मारेन…, महिला ट्रॅफिक पोलिसांसोबत प्रवाशाचे अश्लील वर्तन; मुंबईत नेमकं काय घडलं? VIDEO VIRAL

Vasota Fort Tourism Development : वासोटा किल्ल्याचं रूप पालटलं! आता दरीच्या टोकावर उभं राहून फोटो काढणं होणार सोपं; गडावर वन विभागानं असं काय केलंय?

Latest Marathi News Live Update : परभणीत इंस्टाग्राम स्टोरीवरून तरुणाला मारहाण

Mulank : 'या' 3 महिन्यात जन्मलेल्या लोकांचे 35 वयानंतर चमकते नशीब; असतात लक्ष्मी-कुबेरचे लाडके, पण त्याआधी करावा लागतो खूप संघर्ष

Investment Planning: गुंतवणुकीत एक्झिट स्ट्रॅटेजी नसलेल्या गुंतवणूकदारांवर का येते पश्चात्तापाची वेळ?

SCROLL FOR NEXT