Shri Bhimashankar Mahashivratri Yatra sakal
पुणे

Pune : श्री. क्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्री यात्रेत सुमारे दोन लाख भाविक

एमटीडीसी फॉरेस्ट थांब्यासह सहा वाहनतळ ठेवण्यात आले होते.

अरुण सरोदे

शिनोली : बारा ज्योतिर्लिंगापैकी पुणे जिल्ह्यातील एकमेव श्री. क्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्री यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी हर हर महादेव, जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय अशा घोषणा देत पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले.

रात्री 12 वाजता माजी गृहमंत्री दिलिपराव वळसे पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी अजय मोरे, पुणे जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील उपाध्यक्ष प्रदीप दादा वळसे पाटील, पूर्वताई वळसे पाटील यांनी पवित्र शिवलिंगावर जल्लाभिषेक केला

सकाळी नऊ नंतर भाविकांचा ओघ वाढला होता. दर्शन बारीची रांग मंदिरापासून एमटीडीसी पर्यंत होती. भाविकांना दर्शन घेण्यासाठी तीन ते तास रांगेत उभे रहावे लागत होते.

एमटीडीसी फॉरेस्ट थांब्यासह सहा वाहनतळ ठेवण्यात आले होते. परंतू गर्दीचा ओघ बघता मोठी वहाने तीन व चार क्रमांक थांब्याजवळ पार्क करण्यात आली होती. व दुचाकी पहिल्या वहानतळावर लावण्यात येत होती. एस टी महामंडळाच्या बस भीमाशंकर बस स्थानक पर्यंत जात होत्या. थांब्यापासुन भाविकांना बसस्थानकापर्यंत सोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळाच्या वतीने बसेस ठेवण्यात आल्या होत्या.

यात्रा बंदोबस्तासाठी पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल व खेड पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगावचे पोलिस सहाय्यक निरीक्षक जीवन माने यात्रा बंदोबस्ताचे नियोजन करीत होते. घोडेगाव व खेड पोलिस ठाण्याचा बंदोबस्त नेमला होता. यामध्ये पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी, होमगार्ड तैनात करण्यात आले होते.

अमरसेवा संघ मंचर व यांच्या वतिने भविकांना दिवसभर खिचडी केळी व चहाचे वाटप करण्यात येत होते

प्रातांधिकारी सारंग कोडेलकर, आंबेगावच्या तहसीलदार रामा जोशी, भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे, यांच्या नियंत्रनाखाली दिवसभर यात्रेचे नियोजन चालू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तानचं हे अती झालं! म्हणतात 'हंस्तादोलन' प्रकरणावर कारवाई करा अन्यथा UAE च्या लढतीवर बहिष्कार टाकतो...

Latest Marathi News Updates : आष्टीत पुरामुळे इमारतीवर अडकलेल्या साप्ते कुटुंबाचं हेलिकॉप्टरने रेस्क्यू

खूपच इमोशनल... प्रेक्षकांना कसा वाटला 'लपंडाव' मालिकेचा पहिला भाग? नेटकरी म्हणतात- रुपालीऐवजी दुसरी कुणी...

Crime: अनैसर्गिक कृत्य! २ तरुणांच्या गुप्तांगावर २३ वेळा स्टेपल अन् मिरचीचा स्प्रे...; जोडप्याचा कारनामा, भयंकर कारण समोर

Crime News : नाशिकमधील बेकायदा कॉल सेंटरवर सीबीआयची धाड; यूकेतील नागरिकांना गंडा

SCROLL FOR NEXT