Dagdusheth Halwai Ganpati crowd sakal
पुणे

Pune Transport : पुणे : श्रीगणेश जयंतीनिमित्त वाहतुकीत बदल

श्रीगणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी मार्गावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.

सकाळ वृत्तसेवा

श्रीगणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी मार्गावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.

पुणे - श्रीगणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी मार्गावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुधवारी (ता. २५) सकाळी सहा वाजल्यापासून या मार्गावर वाहतुकीस बंदी राहणार आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.

स. गो. बर्वे चौक येथून शिवाजी रोडने स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपीएमएल बसेस वगळून जड वाहतुकीस बंदी राहील. प्रीमियर गॅरेज चौक ते मंगला सिनेमागृहासमोरुन नागदेव ऑइल डेपो चौक दरम्यान तात्पुरत्या स्वरुपात नो-पार्किंग, नो-हॉल्टिंग करण्यात येणार आहे.

पीएमपीएमएल बसेसचे मार्ग : पीएमपीएमएल बसेससाठी प्रीमियर गॅरेज चौक, मंगला सिनेमागृहासमोरुन उजवीकडे वळून खुडे चौक, उजवीकडे वळून पुणे मनपा कोर्ट कॉर्नर, प्रीमियर गॅरेज चौक असा पुणे मनपा येथील बस मार्ग राहील. स. गो. बर्वे चौकातून छत्रपती श्री शिवाजी महाराज मार्गाने स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपीएमएल बसेस प्रीमियर गॅरेज चौकातून डावीकडे वळून मंगला सिनेमागृहासमोरुन पुढे उजवीकडे वळून खुडे चौक, बालगंधर्व चौक, डावीकडे वळून खंडोजीबाबा चौक, अलका टॉकीज चौक, टिळक रोडने पूरम चौक मार्गे जातील.

स. गो. बर्वे चौकातून छत्रपती श्री शिवाजी महाराज मार्गाने पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या बसेस प्रीमियर गॅरेज चौकातून डावीकडे वळून राष्ट्रवादी काँग्रेस भवनकडून उजवीकडे वळून जातील. तेथून कुंभारवेस चौक डावीकडे वळून शाहीर अमर शेख चौकमार्गे जातील. कोथरुडकडून येणाऱ्या आणि अप्पा बळवंत चौकमार्गे पुणे स्थानकाकडे जाणाऱ्या पीएमपीएमएल बसेस बाजीराव रोडने गाडगीळ पुतळा चौक उजवीकडे वळून कुंभार वेस चौकमार्गे पुणे स्थानकाकडे जातील.

दुचाकी व हलक्या चारचाकी वाहनांसाठी मार्ग :

ही वाहने स. गो. बर्वे चौकातून सरळ जंगली महाराज मार्गाने बालगंधर्व चौकातून डावीकडे वळून इच्छितस्थळी जातील. जिजामाता चौकातून छत्रपती श्री शिवाजी महाराज मार्गाने स्वारगेटकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर वापर करावा. अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणारी सर्व वाहतूक पर्यायी मार्गातून वळविण्यात येणार आहे. ही वाहने बाजीराव रोडने इच्छितस्थळी जातील.

बाजीराव रोडने सायंकाळी मानाच्या गणपतींच्या मिरवणुका सुरु झाल्यानंतर आवश्यकतेप्रमाणे पूरम चौकातून बाजीराव रोडने मनपाकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार इतर मार्गावर वळविण्यात येईल. ही वाहने पूरम चौकातून टिळक रोडने अलका टॉकीज चौक, खंडोजीबाबा चौक मार्गे इच्छितस्थळी जातील, अशी माहिती पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT