Sinhagad Fort 
पुणे

Sinhagad Fort : आत्मविश्वास गमावलेले चेहरे : प्रतिक्रियेला होती अश्रूंची किनार

सिंहगडावरील आजचा सूर्य सन्नाटा पूर्ण वातावरणात मावळतीला गेला

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : सिंहगडावरील वनविभागाची कारवाई दुपारी थंडावली. त्यानंतर गडावर फिरताना कोरोना काळापेक्षा भयानक परिस्थिती पहावयास मिळाली. उद्धवस्त झालेली हॉटेल… अस्तावस्त पडलेले साहित्य… गजबजलेली पायवाट आज निशब्द आणि करूणामय झाली होती… आत्मविश्वास गमावून बसलेले चेहरे… प्रतिक्रियेला होती अश्रूंची किनार… अशा सन्नाटा पूर्ण वातावरणात आजचा सूर्य मावळतीला गेला.

नेहमी गजबजलेला वाहनतळ आज रिकामा दिसत होता. तेथील चालक- मालक त्या पाडकाम केलेल्या ढिगाऱ्यात अस्तित्व शोधत होते. पण या पाच सहा व्यक्ती असून ही तेथे जिवंतपणा दिसत नव्हता. पुणे दरवाजाच्या पायऱ्या चढताना डाव्या बाजूची ऊर्जा देणारी लिंबू सरबतची ओळ आज अशक्त झाली होती.

दुसऱ्या दरवाजातील आजी हसऱ्या चेहऱ्याने आवर्जून आवाज देत पण आज त्यांना अश्रू अनावर झाले होते. गणेश टाक्याजवळील खेळणी विक्री करणारी दुकान होती. येथे खेळण्यासाठी हट्ट करणारी मुले दिसत नव्हती.

वन विभागाच्या विश्रामगृहासमोरुन टिळक बंगल्याकडे जाताना मावशी नेहमी आस्थेने चौकशी करायच्या… आज त्यांची, काय झाले हे, आता आमचं कसं होणार अशी त्यांची आर्जव होती. नरवीरांच्या समाधीच्या अलीकडे परिसरात जास्त हॉटेल आहेत. तेथे साहित्य, कागद, बांबूची गर्दी होती. नेहमी तातडीने चहा देणाऱ्या वहिनी आज मात्र अश्रू रोखू शकल्या नाही. साहित्याची उचलाउचला करण्यात त्या व्यस्त होते. आणि आज सूर्योदयाच्या पूर्वी अतिक्रमण कारवाई सुरू झाली. परिसर उध्वस्त करून सूर्य मावळतीला गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Super El Nino : भयंकर संकट! जगावर घोंघावतोय 'सुपर अल निनो'; नासाच्या उपग्रहाने टिपले धक्कादायक फोटो, 1997 सारखा विनाश होणार?

Shocking News : लग्नाची लगबग, दारात मांडव सजला, पण एक दिवस आधीच वधूसह अख्ख्या कुटुंबाने जीवन संपवलं; धक्कादायक घटनेने सर्वजण हादरले

Iran-Belgium FIFA: इराण-बेल्जियम गोलशून्य बरोबरी; गोलरक्षक अलिझेरा बैरानवंदची अप्रतिम कामगिरी

ठरलं तर मग फेम प्राजक्ता कुलकर्णीने सांगितला गोविंदासोबत काम करण्याची अनुभव, म्हणाल्या...'तो नेहमीच उशिरा येयचा'

Qatar LNG Plant Explosion : कतारच्या एलएनजी प्लँटमध्ये भीषण स्फोट; १२ भारतीयांचा होरपळून मृत्यू, भारतीय दुतावासाकडून चिंता व्यक्त

SCROLL FOR NEXT