पुणे

सिंहगडावर पुणेकरांची तुफान गर्दी; कोरोना नियम पायदळी

निलेश बोरुडे

कोरोना महामारीमुळे सिंहगड पर्यटक व गडप्रेमींसाडी खुला करण्यात आलेला नसताना रविवारी पहाटेपासून ते दुपारपर्यंत तुफान गर्दी झाली होती. कोरोना प्रतिबंधात्मक नियम पायदळी तुडवत पर्यटकांनी गर्दी केली होती.

प्रशासनाने निर्बंध शिथिल केल्यानंतरचा हा पहिलाच रविवार होता. त्यामुळे अनेक नागरिक पर्यटनासाठी, ट्रेकिंगसाठी घराबाहेर पडले. सिंहगडावरील गाडीतळ वाहनांनी खचाखच भरला होता. हजारो पर्यटक सिंहगडावर विनामास्क, सोशल डिस्टंसिंग न पाळता मुक्त संचार करत होते. वनविभागाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी गडावर जाण्यास बंदी असल्याचे सांगत होते मात्र अतिउत्साही पर्यटक कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून गडावर जात होते. अचानक मोठ्याप्रमाणात सिंहगडावर गर्दी उसळल्याने वनविभाग व पोलीस प्रशासन हतबल झाले होते.

गर्दी वाढल्याने हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी इतर ठिकाणांवरील बंदोबस्त कमी करुन तो सिंहगडाकडे वळवला. मोठ्या प्रयत्नांनंतर हवेली पोलीसांना सिंहगडावरील गर्दी कमी करण्यात यश आले.

नागरिकांना आवाहन.....

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सिंहगड पर्यटकांसाठी अद्यापही बंद आहे. त्यामुळे नियम मोडून कोणीही गडावर गर्दी करु नये. अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील. शासनाचे आदेश पाळून सहकार्य करावे असे आवाहन वनविभाग व पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मुंबईचा महापौर ठाकरे बंधू ठरवतील : जयंत पाटील

Bigg Boss Marathi 6 Live Update: 'चला हवा येऊ द्या' फेम सागर कारंडेची बिग बॉसमध्ये एंट्री

Crime: पालकांनी पोटच्या अल्पवयीन मुलीला क्रूरपणे संपवलं; नंतर रात्री अंत्यसंस्कार, धक्कादायक कारण समोर

IND vs NZ: किंग कोहलीची घौडदौड कायम; रचला आणखी एक विश्वविक्रम; सचिन तेंडुलकर, संगकाराला टाकलं मागे

Employees DA: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्राच्या बरोबरीने महागाई भत्ता मिळणार; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

SCROLL FOR NEXT