Murder sakal
पुणे

पुणे : भर दिवसा कोयत्याने वार करुन एकाची हत्या

सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळ एका तरुणाची भर दिवसा पाच ते सहा जणांनी कोयत्याने वार करुन हत्या केली आहे.

निलेश बोरुडे

किरकटवाडी: सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळ एका तरुणाची भर दिवसा पाच ते सहा जणांनी कोयत्याने वार करुन हत्या केली आहे. मारुती लक्ष्मण ढेबे (वय 20, सध्या रा. वारजे, मूळ रा. धनगरवस्ती नांदेड ता. हवेली.) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाली असण्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता.

हवेली पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मारुती ढेबे हा नांदेड फाट्यापासून नांदेड गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला लागून असलेल्या बालाजी स्क्रॅप सेंटर या दुकानात बसलेला होता. त्यावेळी तोंडाला रुमाल बांधून आलेल्या पाच ते सहा जणांनी त्याच्यावर अचानक कोयत्याने हल्ला केला. त्यात ढेबे याचा जागीच मृत्यू झाला. वर्दळीचा रस्ता असल्याने हल्ला झाल्यानंतर या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. परिसरातील नागरिक व व्यावसायिकांमध्ये या घटनेमुळे मोठी दहशत निर्माण झाली आहे.

याबाबत माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे, सहाय्यक फौजदार प्रदीप नांदे, पोलीस हवालदार रामदास बाबर, निलेश राणे, पोलीस नाईक अशोक गिरे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून हवेली पोलीसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for WI Series: रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला झाला... वेस्ट इंडिजविरुद्ध BCCI ची वन डे, ट्वेंटी-२० संघाची घोषणा

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

Marathi News Live Updates : गणेशोत्सवानिमित्त भाजपाध्यक्ष नितीन नबीन यांची मोहोळ यांच्या निवासस्थानी भेट

पाकिस्तानचं नवीन नाटक! PCB नंतर आता हॉकी संघाने भारतात येण्यास दिला नकार; म्हणतात, आमच्या खेळाडूंना सुरक्षित वातावरण हवंय...

SCROLL FOR NEXT