पुणे

Pune RTO : आरटीओत स्मार्टकार्डचा खडखडाट, गडकरींसह मंत्र्यांना पुणेकर पाठवणार १ लाख पत्र

गेल्या दोन महिन्यापासून पुणे आरटीओ कार्यालयाला स्मार्ट कार्डचा पुरवठ्याविषयी सातत्याने अडचणी जाणवत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुण्यासह राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयात वाहन परवाना व वाहन नोंदणी प्रमाणपत्रासाठीचा (आरसी) स्मार्ट कार्ड पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे पुण्यातील सुमारे वीस हजार वाहनचालकांना वाहन परवानासाठी व तीन हजार वाहनचालकांना ‘आरसी’साठी प्रतीक्षा करावी लागत आहे. स्मार्ट कार्डचा पुरवणाऱ्या ‘रोझमार्टा’ या कंपनीचे परिवहन विभागाशी स्मार्ट कार्डच्या पुरवठ्यासाठी करार झाला. मात्र, सातत्याने या कंपनीकडून पुरवठा विस्कळीत होतो. त्याचा फटका सामान्य वाहनचालकांना बसतो.

गेल्या दोन महिन्यापासून पुणे आरटीओ कार्यालयाला स्मार्ट कार्डचा पुरवठ्याविषयी सातत्याने अडचणी जाणवत आहे. पुरवठ्याअभावी महिन्याला दहा ते पंधरा हजार कार्डचा अनुशेष राहतो. दर महिन्याला ही संख्या वाढत जात आहे.

आता किमान वाहन परवानासाठी २० हजार तर आरसीसाठी तीन हजार स्मार्ट कार्डची गरज आहे, अशी परिस्थिती वारंवार निर्माण होत असल्याने मोटार ड्रायव्हिंग स्कूल संघटना केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्य उत्पादन मंत्री शंभूराजे देसाई, परिवहन आयुक्त यांना स्मार्ट कार्डचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता एक लाख पत्रे पाठविण्यात येणार आहे.

वाहन परवानासाठी चाचणी झाल्यावर आठ दिवसांत वाहन परवाना मिळणे अपेक्षित आहे. मात्र, अनेक वाहनचालकांना दोन-तीन महिने वाहन परवाना मिळत नाही. त्यांना आरटीओ कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. आम्ही केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अन्य वरिष्ठ नेत्यांना पत्र पाठवून ८ दिवसांत स्मार्ट कार्डचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करीत आहोत.

- विठ्ठल मेहता, उपाध्यक्ष, मोटर ड्रायव्हिंग स्कूल, पुणे

स्मार्ट कार्डचा तुटवडा आहे. तो सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. संबंधित कंपनीला स्मार्ट कार्डच्या पुरवठ्याविषयी सांगितले आहे.

- डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT