पुणे

सिमल्याने गिरविले पुणे स्मार्ट सिटीचे धडे 

सकाळवृत्तसेवा

पुणे  - सिमला स्मार्ट सिटीचे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या पथकाने पुणे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांची सोमवारी पाहणी करून माहिती घेतली. पुण्यात यशस्वी झालेल्या प्रकल्पांची अंमलबजावणी सिमला येथे करणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. 

सिमला महापालिकेचे उपमहापौर राकेश शर्मा यांच्या नेतृत्वाखाली लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या 36 सदस्यांचा या दौऱ्यात समावेश होता. सिमला स्मार्ट सिटीचे सरव्यवस्थापक प्रशांत सिरसेक यांचाही त्यात समावेश होता. देशातील यशस्वी स्मार्ट शहरांपैकी एक अशी पुण्याची ओळख आहे, असे सांगत शर्मा यांनी पुणे स्मार्ट सिटीचे कौतुक केले. 

सिरसेक म्हणाले, ""स्मार्ट सिटीतील पथदर्शी प्रकल्पांची अंमलबजावणी पुणे स्मार्ट सिटीने यशस्वी करून दाखवली आहे. सिमला येथे त्याचे अनुकरण करण्यासाठी या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकल्पांविषयीचे ज्ञान उपयुक्त ठरेल.'' 

पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी त्यांचे स्वागत केले. ते म्हणाले, ""आमचा स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा अनुभव ऐकण्यासाठी इतर स्मार्ट सिटींचे प्रतिनिधी येत आहेत, याचा आम्हाला आनंद आहे. त्यामुळे पुणे स्मार्ट सिटीच्या काही प्रकल्पांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळी ओळख प्राप्त झाली आहे.'' 

पुणे स्मार्ट सिटीतील रस्ते पुनर्रचना, प्लेस मेकिंग, पब्लिक बायसिकल शेअरिंग, कमांड अँड कंट्रोल सेंटर, पुणे वाय-फाय व स्मार्ट एलिमेंटस आदी कामे पूर्ण झालेल्या प्रकल्पांची तसेच सध्या कामे सुरू असलेल्या आणि नियोजित प्रकल्पांविषयी सादरीकरणांद्वारे या प्रतिनिधींना माहिती देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price Today: पेट्रोल-डिझेल आणि CNG चे नवे दर जाहीर; पुणे, मुंबईसह महाराष्ट्रात आज किती भाव?

Latest Marathi News Update : चित्रपट महामंडळ निवडणुकीत समर्थ पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी

Uddhav Thackeray INDIA Alliance : उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतून बाहेर पडणार?, ठाकरेंच्या सवालाने दिल्लीतील बैठकीत नाराजीचे सूर

Donald Trump : मैत्रीत दुरावा ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांना इराण हल्ल्यावरुन कडक इशारा, नेमकं काय घडलं?

राऊत-देशमुख चौथ्यांदा भेट; मित्रासाठी मालक मैदानात, विधान परिषद निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा, मैत्रीची साथ अन् पक्षनिष्ठेचा संदेश..

SCROLL FOR NEXT