पुणे

वेळीच उपचारांमुळे सर्पदंशावर यशस्वी मात

CD

पुणे, ता. ६ : सर्पदंश ही प्राणघातक घटना मानली जात असली, तरी रुग्णांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळाल्यास त्यांचे प्राण वाचवता येतात, हे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे. गेल्या अडीच वर्षांत पुणे जिल्हा आणि परिसरात सर्पदंशाच्या तब्बल ३ हजार ८४ घटनांची नोंद झाली. आरोग्य यंत्रणेची सतर्कता आणि वेळेत मिळालेल्या उपचारांमुळे यापैकी ९९.९ टक्के, म्हणजेच ३ हजार ८२ रुग्णांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. या कालावधीत केवळ दोन रुग्णांचा मृत्यू झाला.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२४ ते जुलै २०२६ या २८ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील मंचर, चांदोली, भोर आणि जुन्नर हे तालुके सर्पदंशाचे प्रमुख ‘हॉटस्पॉट’ ठरले आहेत. पावसाळ्यात तसेच शेतात काम करताना सर्पदंशाच्या घटना सर्वाधिक घडतात. या भागांत विषारी आणि बिनविषारी अशा दोन्ही प्रकारच्या सापांचा वावर असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये सर्पदंशाची भीती कायम असते.

ग्रामीण आरोग्य केंद्रांतच मिळतात उपचार
पूर्वी ग्रामीण भागात सर्पदंश झाल्यानंतर रुग्णाला शहरातील रुग्णालयात आणेपर्यंत बराच वेळ जात असे. त्यामुळे उपचारास विलंब होऊन मृत्यूचे प्रमाण अधिक होते. मात्र, आता प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये ‘अँटी-स्नेक व्हेनम’ अर्थात सर्पदंशावरील प्रतिविषाचा (लसीचा) पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्यात येत आहे. तसेच, येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सर्पदंशाच्या रुग्णांच्या व्यवस्थापनाचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे ९९.९ टक्क्यांहून अधिक रुग्णांना वेळेत उपचार मिळून त्यांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे, अशी माहिती पुण्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांनी दिली.

‘अधिसूचित आजार’ केल्‍याचा फायदा
राज्य सरकारने सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित केल्यामुळे खासगी रुग्‍णालयांनाही याची नोंद शासनाकडे करावी लागणार आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालये आणि क्लिनिक्सना सर्पदंशाच्या प्रत्येक घटनेची नोंद प्रशासनाकडे करणे बंधनकारक झाले आहे. याशिवाय रुग्णालयात उपलब्ध असलेल्या ‘अँटी-स्नेक व्हेनम’ लसीच्या साठ्याची नियमित माहिती देणे सक्तीचे करण्यात आले आहे.

सर्पदंश झालेली जागा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी. सर्पदंश झाल्यानंतर घाबरून न जाता रुग्णाला तातडीने दवाखान्यात घेऊन जावे. साप विषारी आहे की बिनविषारी, हे माहीत नसले तरी वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालयांमध्येही सर्पदंशावरील उपचार आणि प्रतिविष उपलब्ध असते. आपल्या भागात नाग, घोणस, मण्यार आणि फुरसे या चार प्रमुख विषारी सापांच्या जाती आढळतात. इतर बहुतांश साप बिनविषारी आहेत.
- संजय चंद्रकांत तावरे, सर्पमित्र, हिंगणे खुर्द

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Police: 2 हजार 850 बनावट अ‍ॅप्स अन् 9 हजार 673 नागरिकांची 150 कोटींची फसवणूक; मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश

रशियातील लॅब टेक्निशियनच्या मृत्यूने खळबळ; न्यूमोनिक प्लेगची चर्चा, भारताची चिंता वाढली?

Sangli Mother Child Death : सांगली जिल्ह्यात धक्कादायक घटना! आई-बाळाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू

Strait of Hormuz Attack : होर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; ११ भारतीय खलाशी जखमी

Satej Patil Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या बिनविरोधसाठी सतेज पाटलांना ४ जागा?, बंटी पाटलांनी हसत हसत कंडका पाडला

SCROLL FOR NEXT