pune solapur highway bus accident 2 women killed 30 injured police marathi news sakal
पुणे

Pune Accident : पुणे सोलापूर महामार्गावर आराम बसचा भीषण अपघात; दोन महीलांचा मृत्यू, 30 जखमी

पुणे सोलापुर महामार्गाने लातुरहुन पुण्याकडे जाणाऱ्या आराम बसचा दौंड तालुक्यातील पाटस येथे भीषण अपघात

अमर परदेशी

पाटस : पुणे सोलापुर महामार्गाने लातुरहुन पुण्याकडे जाणाऱ्या आराम बसचा दौंड तालुक्यातील पाटस येथे भीषण अपघात झाला. यामध्ये दोन महीला प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.तर एक गंभीर तसेच तीस प्रवाशी जखमी झाले.

गुरुवारी (ता.२६) पहाटेच्या सुमारास आराम बस रस्त्याच्या बाजुला उभ्या असणाऱया सिमेंट वाहतुकीच्या ट्रकला धडकल्याने हा भीषण अपघात झाला.सत्याभामा बोयने (वय ७२) रा.शहाजा-निलंगणा (लातुर),श्वेता पंचाक्षरी रा.शहाजा-निलंगणा (जि.लातुर) अशी मयतांची नावे आहेत.तर बाळासाहेब शिरखाने रा.सोलापुर हे गंभीर जखमी आहेत.

याबाबत पाटस पोलिस चौकीचे फौजदार संजय नागरगोजे यांनी माहीती दिली.पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गाने लातुरहुन एक आऱाम बस प्रवाशी घेवून पुण्याकडे जात होती. पहाटेच्या सुमारास दौंड तालुक्यातील पाटस घाटात रस्त्यात बंद पडलेल्या सिमेंट वाहतुकीच्या ट्रकला आराम बसची जोराची धडक बसली. अपघात इतका भिषण होता की बस भररस्त्यात उलटली.

आराम बसच्या डावीकडील भागाचा पुरता चुराडा झाला.यावेळी दोन महीला प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.तर एक जण गंभीर जखमी झाले.मृतांमध्ये दोन्ही महीलेंचा समावेश आहे.एकुण तीस जण जखमी झाले. पहाटेच्या वेळी प्रवाशांचा आक्रोश,बसमध्ये रक्ताचे सडे या दृश्याने अनेकांची मने हेलावून गेली.

माहीती मिळताच यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे,पाटस पोलिस चौकीचे उपनिरीक्षक संजय नागरगोजे,महामार्ग पोलिस उपनिरीक्षक महेश कोंडुभैरे,श्रीहरी पानसरे आदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी नागरीकांच्या मदतीने बसमधील जखमी व्यक्तींना तत्काळ बाहेर काढुन उपचारासाठी पाठवून देण्यात आले.मृत व्यक्तींना शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.यावेळी पुरुष,महीला,लहान मुले-मुलींसह एकुण तीस जण जखमी झाले.गंभीर जखमी व्यक्तीला उपचारासाठी ससुन रुग्णालयात पाठविण्यात आले.

दरम्यान,मयत श्वेता पंचाक्षरी या पुणे दिनानाथ मंगेशकर हाॅस्पीटल मध्ये डाॅक्टर असल्याचे समोर आले आहे. अपघाता नंतर ट्रकमधील सिमेंट रस्त्यावर पसरलेले गेले.शिवाय आराम बस रस्त्यात उलटल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. पोलिसांना पर्यायी मार्गाने वाहतुक वळवावी लागली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arif Khan Chishti : मुस्लिम तरुणाचा मोठा निर्णय! संत प्रेमानंद महाराजांना किडनी दान करण्याची तयारी, वाचा कोण आहे आरिफ खान?

Whatsapp Mirror : व्हॉट्सअ‍ॅपवर एक परमिशन अन् बँक अकाऊंट रिकामं, 'हे' फेमस फीचर ठरतंय मोबाईल हॅकिंगचं कारण

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT