Accident
Accident Sakal
पुणे

पुणे-सोलापूर हायवेवर कारची समोरासमोर धडक; वाहतूक वळविल्याचा फटका

सावता नवले

कुरकुंभ - कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी महामार्ग व सेवा रस्त्यावर येत असल्याने पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील (Pune Solapur National Highway) वाहतुक (Traffic) वळविण्याचा फटका दोन कारचालकांना बसला आहे. चालकांचा गोंधळ उडाल्याने दोन्ही कार समोरासमोर धडकल्याने (Accident) चार जण जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे नुकसान (Loss) झाले आहे. हा अपघात शुक्रवारी (ता. 4) दोनच्या सुमारास घडला. (Pune Solapur Highway Car Accident by Traffic Divert)

महामार्गाची पुण्याकडून सोलापूरकडे जाणाऱ्या मुख्य लेन व सेवा रस्त्यावर कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील रसायनमिश्रीत सांडपाणी साचल्याने पुण्याकडून येणारी वाहतुक समोरून येणाऱ्या लेनवर वळविण्यात आली होती. त्यामुळे पांढरेवाडी (ता. दौंड) हद्दीत महामार्गावरून पुण्याकडून येणारी मारूती डिझायर कार (एमएच. 02, सीआर. 2555) व समोरील सोलापूर बाजूकडून येणारी टाटा इंडिका कारमध्ये (एमएच. 42, ए. 1346) जोरात धडक झाली. अपघातात दोन्ही कारच्या समोरील बाजूचे नुकसान झाले असून त्यामध्ये चार जण जखमी झाले.

जखमी झालेल्यांमध्ये राजेंद्र लोणकर, दत्ताञेय लोणकर (दोघे. रा. माळेवाडी, ता. बारामती) यांचा समावेश आले. तर इतर दोन जखमींची नावे समजू शकली नाही. जखमींना उपचारासाठी दौंड येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. यासंदर्भात पोलिसात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. हा अपघात महामार्गावरील टोलवसुल करणाऱ्या कंपनीच्या हलगर्जीपणा व रस्त्यावर कंपन्यांनी सोडलेल्या सांडपाण्यामुळे झाला आहे. यासंदर्भात ठोस कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Labour Day : गरजूंना हमखास रोजगार मिळवून देणारी ही सरकारी योजना तुम्हाला माहीत आहे का ?

ढिंग टांग : भटकती आत्मा आणि बाबा बंगाली..!

Maharashtra Day 2024: मराठी गिरा दिसो...!

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

SCROLL FOR NEXT