पुणे

पुणे-सोलापूर महामार्गाच्या भूसंपादनाबाबत बैठक

CD

लोणी काळभोर, ता. २ : पुणे-सोलापूर उन्नत महामार्गासाठी प्रस्तावित जमीन संपादनाच्या मोजणीबाबत हडपसर ते उरुळी कांचन परिसरातील शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या समवेत महत्त्वपूर्ण बैठक झाली. राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत जुन्या संपादनातील त्रुटी आणि मोबदल्याबाबत चर्चा करण्यात आली.
सन २००४ मधील जमीन संपादनाची प्रक्रिया काही ठिकाणी चुकीची झाल्याचे आणि अनेक शेतकऱ्यांना अद्याप मोबदला न मिळाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. नव्या संपादनाची हद्द कशी निश्चित होणार आणि मोबदला किती मिळणार, यावरही सविस्तर चर्चा झाली. प्रत्येक गावात स्वतंत्र बैठक घेऊन शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतरच मोजणी प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही आणि प्रत्येकाला योग्य मोबदला मिळेल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
यावेळी शेतकऱ्यांनी प्रकल्प अधिकारी विठ्ठल उदमले यांचीही भेट घेऊन नवीन नोटिसा देण्याची मागणी केली. बैठकीस माजी नगरसेवक शिवाजी पवार, कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे, संभाजी हाके, विजय कोद्रे, चंद्रकांत शेवाळे, शेवाळेवाडीचे माजी सरपंच बाळासाहेब मोरे, लोणी काळभोरचे माजी उपसरपंच राजेंद्र काळभोर यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

₹85 लाख CTC, पण हातात फक्त ₹3 लाख! बाकीचे पैसे कुठे जातात? कंपनीच्या वाइस प्रेसिडेंटनेच सांगितलं पगाराचं खरं गणित

IND vs PAK Final: वैभव-श्रेयस स्वस्तात परतले, पण अभिषेक-तिलकने डाव सावरला! शेवटच्या षटकांत धावांचा पाऊस; भारताची गाडी २०० पार

Asangaon-Kasara Rail Block : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! कसारा रेल्वेमार्गावर 7 ते 18 ऑक्टोबरदरम्यान मोठा मेगाब्लॉक; आसनगाव-कसारा लोकल सेवा बंद

चेहऱ्यावर नाही, ‘या’ गोष्टींवरून ओळखा माणसाचा स्वभाव; चाणक्य नीती काय सांगते?

Latest Marathi News Live Update : विरारमध्ये उद्घाटन कार्यक्रमावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

SCROLL FOR NEXT