Pune Solapur Highway Patas bus road accident
Pune Solapur Highway Patas bus road accident sakal
पुणे

पुणे : पाटस-लक्झरी बसच्या अपघातात 1ठार तर 14 प्रवासी जखमी

अमर परदेशी

पाटस : पुणे सोलापुर महामार्गावर पाटस (ता.दौंड) हद्दीत लक्झरी बस चालकाचा बेफिकीरपणा काही प्रवाशांच्या मुळावर उठला. लक्झरी चालकाने विरुध्द दिशेला असणाऱया ढाब्यावर जाण्यासाठी बस अचानक पलिकडील मार्गावर घेतली.यावेळी ट्रक आणि बस यांच्यात धडक होवुन अपघात झाला.यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू तर ट्रक चालकासह बसमधील चौदा प्रवाशी जखमी झाल्याची घटना घडली.

याबाबत पोलिस हवालदार सुनिल बगाडे यांनी माहीती दिली.पुणे सोलापुर महामार्गावरुन मंगळवारी लक्झरीबस ही पुणे बाजुकडुन सोलापुरला जात होती. दौंड तालुक्यातील पाटस हद्दीत रात्री साडे अकरा वाजता टोलनाक्याच्या पुढे बस चालक याला जेवणासाठी पलिकडील बाजुला असणाऱया ढाब्याकडे जायचे होते. मात्र, चालकाने कसलीच तमा न बाळगता,वाहतुकीचे कोणतेच नियम न पाळता, समोरील बाजुच्या वाहनांना इशारा न करताच बस बिनधास्त विरुध्द दिशेच्या मार्गावर घेतली.

त्यावेळी पुण्याकडे जाणारा एक मालट्रक व बस यांच्यात भीषण धडक झाली.या भीषण अपघातात बसमधील प्रवासी मारुती ग्यानबा वडेर (वय २६) राहणार षिकारा ता.मुखेड जि.नांदेड यांचा जागीच मृत्यू झाला.तर ट्रक चालक हवासिंग,बसमधील प्रवासी-अर्चना देशमुख,श्रेया श्रीकंठवार,बालाजी पाटील,यश पाटील,दिगंबर जाधव,फिरोज काझी,लक्ष्मीबाइ सुद्रे,उषाबाइ खांडेकर,विठ्ठल कोरंबे,माधव इंगळे,माधव पांचाळ,विजय वडेर,भाऊ वडेर हे जखमी झाले.

माहीती मिळताच यवत पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस उपनिरीक्षक सुनिल बगाडे,आबा बंडगर,अजित इंगोले,रमेश चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले.मयत वडेर यांचा मृत्यूदेह विच्छेदनासाठी पाठवुन दिला.दरम्यान,पांडुरंग वडेर यांच्या फिर्यादीवरुन लक्झरी चालका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT