पुणे

घोरपडीत वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांचे हाल

CD

घोरपडी, ता. २५ : पुणे-सोलापूर महामार्गावर बुधवारी सकाळी विविध ठिकाणी वाहने बंद पडणे आणि अपघात घडल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. भैरोबानाला चौक, फातिमानगर चौक, बी टी कवडे रस्ता, घोरपडी, रामटेकडी, वैदूवाडी तसेच हडपसर परिसरातील प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.

सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास भैरोबानाला चौकात एका ट्रकचा टायर निकामी झाल्याने तो रस्त्यात बंद पडला. त्यानंतर पुढे काही अंतरावर पीएमपीएमएलची बस बंद पडली. तसेच ९३ एव्हेन्यू मॉल चौकाजवळ सावता माळी दुकानासमोर अपघात झाल्याने वाहतुकीचा वेग मंदावला. रामटेकडी येथेही एक ट्रक बंद पडल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली.

या सलग घटनांमुळे भैरोबानाला चौक ते वैदूवाडी आणि हडपसरपर्यंतच्या मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली. कार्यालये आणि शाळांची वेळ असल्याने वाहनांची संख्या वाढली व महामार्गावरील ताण अधिक वाढला. सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले होते. तीन नंतरही संथ गतीने वाहतूक सुरू झाली.

महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे व रेल्वे फाटक परिसरात पावसामुळे आणि वाहनांच्या वाढत्या गर्दीमुळे घोरपडी गावात वाहतूक संथ झाली होती. तसेच सोपानबाग परिसरातही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे स्थानिक रस्त्यांवरही कोंडीमुळे जाम झाले होते.
-अतुल क्षिरसागर, पोलीस उपनिरीक्षक, वानवडी वाहतूक विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizenship Proof Law: पासपोर्ट हा फक्त प्रवासाचा दस्तऐवज; तर भारतीय नागरिकत्वाचा खरा पुरावा कोणता? कायदा काय सांगतो?

घरच्या घरी मेथी, कोथिंबीर, टोमॅटोची शेती... जुही चावलाने घरातच तयार केलं मिनी फार्म

India vs Ireland सामन्याची वेळ बदलली; नेमका किती वाजता सुरू होणार आणि कुठे पाहता येणार? कारण काय तर

आणि स्वतःच्या खिशात काहीही नसताना श्रेयसने मला पैसे दिले... जितेंद्र जोशीने सांगितला तो प्रसंग, म्हणाला, 'आता तो...'

Air India Flight Incident : एअर इंडियाचे विमान अचानक पाकिस्तानात पोहोचले, वैमानिकावर कारवाई; चूक की जाणीवपूर्वक रचलेले कारस्थान?

SCROLL FOR NEXT