accident  sakal
पुणे

Pune Accident : पुणे - सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर डाळज क्र. १ येथे अपघात

गृहप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या तिघांवर मृत्यू घाला तर एक गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा

भिगवण : पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर डाळज क्र. १(ता.इंदापुर) येथे वाहन चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटुन झालेल्या भीषण अपघातांमध्ये लातुर येथून नातेवाईकाच्या गृहप्रवेश कार्यक्रमासाठी पुण्याला निघालेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शुक्रवारी(ता.२४) पहाटे तीनच्या सुमारास घडला.

संदिप राजाभाऊ माळी( वय ३५), बालाजी केरबा तिडके(वय.४८), सरस्वती राजाभाऊ माळी(वय.६१ रा. सर्व रा. गातेगाव ता.जि. लातुर) अशी अपघातामध्ये मयत झालेल्या व्यक्तीची नावे आहेत तर चंद्रकांत रामकिसन गवळी(वय. ५४ रा. दिपज्योतीनगर ता. जि लातुर) हे अपघातामध्ये गंभीर जखमी झाले आहेत.

या प्रकरणी चंद्रकांत गवळी यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी यातील फिर्यादी व त्यांचे नातेवाईकांसह त्यांचे होणाऱ्या जावयाच्या गृह प्रवेश कार्यक्रमासाठी लातुरहुन पुणे येथे त्यांचेकडील स्वीफ्ट मोटार कार(क्र. एम.एच. ४३ बी.एन. १४०२) मधुन निघाले होते.

पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर इंदापुर तालुक्यातील डाळज क्र. १ येथे चालकाने त्याचेकडील वाहन भरधाव वेगात व वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन चालविल्यामुळे त्याचे वाहनावरील नियत्रंण सुटले व स्वीफ्ट मोटार कारची पलटी होऊन झालेल्या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर येथील खासगी रुग्नालयांमध्ये उपचार करण्यात येत आहे.

या प्रकरणी वाहन चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक विनायक दडस-पाटील करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam Pattern : एमपीएससी प्रश्नपत्रिकांची सुरक्षितता अन् वेळापत्रक बदलणार? कृती दलाचे सदस्य डॉ. प्रवीण गेडाम अंतिम अहवालाबाबत नेमके काय म्हणाले?

Asia Cup 2026: BCCI ने सांगितलं अन् टीम इंडियाने केलं! मोहसिन नक्वींच्या हातून ट्रॉफी न घेण्यावर कोच मुजुमदार यांचं स्पष्ट उत्तर

Maharashtra ST: एसटी प्रवाशांसाठी मोठी गुड न्यूज! ताफ्यात येणार ५ हजार नव्या ‘लालपरी’; ‘टाटा मोटर्स’ची निविदेत बाजी

“रुबाब आहे!” कोकणच्या निसर्गात रमली ‘सनई चौघडे’ फेम शर्वरी; म्हणाली...“मी जवळजवळ स्वर्गात…”

Marathi News Live Updates : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी; अमित शाहांसह उद्धव ठाकरे आज बाप्पाचं घेणार दर्शन

SCROLL FOR NEXT